अध्याय-१०-श्रीकृष्णांचे द्वारकागमन

अध्याय १० श्रीकृष्णांचे द्वारकागमन
१-६ युधिष्ठिराचे राज्य
१ शौनक ऋषी महाराज युधिष्ठिराच्या राज्यकारभाराबद्दल विचारतात –युद्धाचा हेतू:- युधिष्ठिराचे राज्य बळकावण्याची इच्छा असलेल्या सर्व शत्रूंचा नायनाट करणे , युधिष्ठिराचा उल्लेख “ धर्माचरण करणार्यांमध्ये श्रेष्ठ असा केला आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या बंधूसमवेत राज्याचा अनिर्बंध उपभोग नक्कीच केला नसेल.
२ अ)श्रीकृष्ण प्रसन्न होण्याची कारणे- क्रोधाच्या वणव्यात कुरु वंश नष्ट झाला. उदा. बांबूच्या घर्षणाने जंगलात अग्नी सर्व नष्ट करतो तसेच….कुरु वंश , आणि दुसरे युधिष्ठीराला राजा प्रस्थापित करण्यात आले. ब) श्रीकृष्णाला उद्देशून तीन नावे या श्लोकात दिली आहे – भवभावनो – जगाचे पालन-पोषणकर्ते , हरी- पूर्ण पुरुषोत्तम भगवान , ईश्वरः- परम नियंत्रक
३ अ)युधिष्ठिराने आपल्या धाकट्या भावांसोबत पृथ्वीवर राज्य केले –कसे ?- भीष्मदेव यांच्या उपदेशांनुसार आणि श्रीकृष्ण यांच्या संरक्षणाखाली, इतर पांडवांनी सदैव त्यांच्या आदेशांचे पालन केले ब) त्यांचे सर्व संशय नष्ट झाले
४ राज्याचे वैभव:-अ)सर्वत्र आवश्यक तेवढा पाऊस पडत असे, ब)पृथ्वी आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन देत असे, क) गायी इतक्या आनंदी दिसत की त्यांच्या दुधाने जमीन सतत ओली असे, ड) नद्या , समुद्र ,डोंगर पर्वत, अरण्य, झाडे तसेच औषधी वनस्पती राजाला प्रत्येक ऋतूत विपुल प्रमाणात कर अर्पण करीत असत- य) राज्यातील प्रजेला मानसिक चिंता, शारीरिक व्याधी, अति उष्ण किंवा अति शीत वातावरणाचा त्रास होत नसे.
७-१९ कृष्ण द्वारका गमनास तयार झाल्यावर त्याचा भक्तांवर परिणाम
काही महिने कृष्ण हस्तिनापुरात का राहतात?–नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी , भिष्मदेवाला विशेष कृपा देण्यासाठी आणि सुभद्रेला प्रसन्न करण्यासाठी कारण नुकताच अभिमन्यूचा मृत्यू झाला होता.
८ नंतर परत निघण्याची विनंती मागतात, युधिष्ठीर महाराज ती मान्य करतात –कृष्ण त्यांना नमस्कार करतात आणि युधिष्ठीर त्यांना आलिंगन देतात.
९ सर्व भक्तांना हे समजल्यावर विरहाच्या विचाराने बेशुद्ध होण्याची पाळी आली.
१० सर्व कृष्णाकडे एकटक बघायला लागले –
१३ सर्व गोंधळून गेले आणि काय करावे म्हणून फिरत होते.
१४ स्त्रिया अपशकून होवू नये म्हणून आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करू लागले-
१५ विशिष्ट समारोप म्हणून विविध प्रकारचे वाद्य एकत्र वाजायला लागली –
१६ कुरुवंशाच्या स्त्रिया राजप्रसादाच्या शिखरावरून स्मित हास्य करीत भगवंतांवर पुष्प वर्षाव करू लागल्या-
१७-१८ अर्जुन रत्नजडीत छत्र हाती धरतात- उद्धव आणि सात्यकी चामराने भगवंतांना वारा घालतात –
१९ ब्राह्मणांनी भगवंतांना आशीर्वाद दिला –भगवंत नर-लीला करत असलेल्या परम पुरुषासाठी असल्याकारणाने हे आशीर्वाद योग्य ही नव्हते आणि अयोग्यही नव्हते
२०-३० हस्तिनापुरातील स्त्रियांच्या राजवाड्याच्या गच्चीवर झालेल्या कृष्णाबद्दलच्या चर्चा
हस्तिनापुरातील स्त्रियांनी केलेली स्तुती भगवंतांना वेदिक सूत्रांपेक्षाही जास्त रमणीय वाटत होती-
२१ आदि पुरुष – प्रकृतीच्या प्राकटिकरणापूर्वी फक्त तेच अस्तित्वात होते- संहारा दरम्यान सर्व जीव त्यांच्यात विलीन होतात, जसे रात्री सर्व झोपतात.
२२ भगवंत आपल्या सामर्थ्याने तीन गुणांच्या अध्यक्षतेखाली सर्वांची पुनर्निर्मिती करतात.
२३ एकाग्र भक्तीने पूर्ण शुद्ध झालेल्या भक्तांनाच त्यांचे आध्यात्मिक रूप अनुभवता येत.
२४ त्यांच्या महान भक्तांनी ,त्यांच्या आकर्षक आणि गुह्य लीला वेदांच्या गोपनीय विभागात वर्णन केल्या आहेत. हेच भगवंत प्रकृतीची निर्मिती, पोषण आणि संहार करूनही अनासक्त असतात.
२५ अधम शासनकर्त्यांना धडा शिकविण्यासाठी, आपल्या नैष्ठिक भक्तांवर विशेष कृपा करण्यासाठी, अद्भुत कार्ये करून जीवांना आकर्षित करण्यासाठी भगवंत विविध दिव्या रूपे धारण करतात.
२६ यदु वंश, मथुरा नागरी, किती पुण्यवान आहेत जिथे सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ लक्ष्मीपतीने जन्म घेतला आणि बालपणी तिथे विहार केला.
२७ निसंशय द्वारकेने स्वर्गलोकाच्या वैभवाला मागे टाकले आणि पृथ्वीचा गौरव वाढविला. द्वारकेतील नागरिक नित्य रूपाने श्रीकृष्णांचे प्रेमळ रूप निरखून बघत असत.
२८ त्यांच्या अर्धांगिनी यांच्याबद्दल विचार करा, किती व्रत, यज्ञ आणि पूजा केल्या असतील त्यांनी की आता त्या नित्यपणे भगवंतांच्या अधरामृताचा चाखतायेत.अशा आशेने तर व्रजगोपी बेशुद्ध पडतील.
२९ त्यातील रुक्मिणी , सत्यभामा आणि जाम्बवती यांना तर भगवंतांनी स्वयमवरातून उचलून आणले आहे. आणि इतर स्त्रियांचे हरण करतांना त्यांनी भौमासुरासह सहस्त्रावधी बलशाली राज्यांचा वध केला. या सर्व स्त्रिया वैभवशाली आणि भाग्यवान आहेत.
३० या स्त्रियांना स्वातंत्र्य किंवा शुद्धता नसूनही त्यांनी त्यांचे जीवन मंगल आणि भाग्यवान केले. कारण श्रीकृष्णाने त्यांना कधीच घरी एकटे ठेवले नाही, आणि विविध प्रकारच्या भेट वस्तू देवून त्यांची अंतःकरणे नेहमी प्रसन्न ठेवली.
३१-३६ कृष्ण द्वारकेस निघतात
३१ अशाप्रकारे त्यांनी भगवंतांचा निरोप घेतला – श्रीकृष्णाने त्यांच्यावर कृपादृष्टी टाकून त्यांच्यातर्फे केल्यागेलेली सर्व स्तुती स्वीकारतात आणि द्वारकेकडे जाण्यास तयार होतात.
३२ श्रीकृष्णांचे असुरांपासून संरक्षण व्हावे म्हणून युधिष्ठीर ज्याला कोणी शत्रू नाही, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ असे चार विभाग असणाऱ्या सेनेला बरोबर पाठवतात.
३३ पांडव श्रीकृष्णाप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे काही अंतर त्यांच्या सोबत जातात.नंतर भगवंत त्यांना परत जाण्यास सांगतात.
३४-३६ भगवंतांचा रथ कुरुजंगल , पांचाल इत्यादी प्रदेशातून पुढे जात द्वारकेस पोहोचतो, प्रत्येक सायंकाळी भगवंत आपले व्रत, साधना पूर्ण करण्यास विविध प्रदेशात थांबतात, तेथिल मुख्य व्यक्ती त्यांचे स्वागत आणि पूजा करतात.