अध्याय-११-श्रीकृष्णाचे-द्वारकेत आगमन

अध्याय ११ श्रीकृष्णाचे द्वारकेत आगमन
१-१० द्वारकावासियांकडून कृष्णाचे स्वागत
श्रीकृष्णाच्या पंचजन्य शंख नादाचा परिणाम –
• हा शंख नाद यमराजालाही भयभीत करणारा होता,
• पण तो एकून द्वारकावासीयांच्या मनातील खिन्नता दूर झाली,
• शंख श्रीकृष्णांच्या अधराच्या स्पर्शाने लालसर झाला,
• हे दृश्य असे भासत होते की जसे कलहंस कमळ पुष्पातील अमृत काढण्याचा प्रयत्न करतो आहे,
श्रीकृष्णांनी सर्व नागरिकांनी केलेली स्तुती आणि भेटवस्तू स्वीकारल्या आणि प्रत्येकाला साजेसा प्रतिसाद देवून संतुष्ट केले.नागरिकांच्या प्रार्थना ( ६-१०) भाषांतर वाचा
११-१५ द्वारकेचे वर्णन
• संरक्षण – द्वारकेचे संरक्षण सतत इतर यदुवंशाद्वारे होत होते,
• वैभव- सर्व ऋतू पूर्णपणे हजर असत,
• सजावट- नगराच्या प्रवेश द्वारापासून ते प्रत्येक घरासमोर विशिष्ट सजावट केली होती.
सविस्तर सजावट व्यवस्था (११-१५) भाषांतर वाचा
१६-२२ विविध वर्गाकडूनश्रीकृष्णाचे स्वागत
• पुरुष,
• वैश्या,
• इतर कलाकार.
आणि त्या सर्वांना श्रीकृष्णांचा प्रतिसाद
२३-२७ राजमार्गावर चालतांना वर्णन केलेले श्रीकृष्णांचे सौंदर्य
त्यांना बघितल्यावर प्रत्येकावर झालेला परिणाम , श्रीकृष्णांचे सविस्तर सौंदर्य (२६-२७) भाषांतर वाचा
२८-३३ राजवाड्यातील स्त्रियांशी प्रतिसाद
• मातांशी ,
• पत्नींशी भेट (३१-३२) भाषांतर सविस्तर वाचा
३४- ३९ श्रीकृष्णांच्या विविध व्यवहाराने त्यांची दिव्यता( प्रधानत्व) कशी शाबूत राहते
• श्रीकृष्ण स्वतः तटस्थ असूनही राक्षसांचा वध करतात ,
• ग्रह्स्ताश्रम पूर्णपणे पालन करूनही अनासक्त राहतात,
• त्यांचे भक्त जर तीन गुणांच्या प्रभावात येत नाही तर श्रीकृष्णांवर प्रकृतीचा कसा प्रभाव पडेल,
• श्रीकृष्णांच्या द्वारका लीलांबद्दल साधारण व्यक्तीचा समाज काय असतो?
• स्वतः श्रीकृष्णांच्या राण्यांना त्यांच्याबद्दल काय वाटत?