मंत्र १

इशोपनिषद मंत्र १

1. इशावास्यम:- जगात जे काही अस्तित्वात आहे ते भगवंतांच्या मालकीचे आहे.
2. म्हणून प्रत्येकाने आपल्या गरजे प्रमाणे जो आपला वाटा किंवा हिस्सा आहे तेवढेच घ्यावे.
3. अपौरुषेय:- भगवंतांनी जे आपल्याला दिलेले आहे, जे प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे आहे.
4. युद्धाच कारण आणि शांतीचे सूत्र
5. मानव जीवन आणि जनावराचे जीवन यातील फरक आणि मानव जीवनाचे महत्व
6. अचूक वेदिक ज्ञान आणि मानव आणि जनावर यांच्या विषयीचे त्याचे महत्व
7. जीव आपला भगवंतांशी असणारा सबंध प्रस्थापित करून स्वतःत पूर्णत्व कशा प्रकारे आणु शकतो याचे विवरण
8. शाकाहार आत्मसाक्षात्कारासाठी पुरेसा नाही, कृष्ण प्रसाद ग्रहण करणे आवश्यक.
9. पाप व्याख्या :- भगवंतांचा मालकी हक्क धुत्कारून, जाणून बुजून प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करणे.
10. या मंत्रात आपण भगवंतांना समजण्याचा प्रयत्न करतो आहोत ..अभिदेय
11. बद्ध जीवाचे चार दोष
• चुका करणे
• भ्रमात मोहात येणे
• फसवणूक करण्याची प्रवृत्ती
• अपूर्ण इंद्रिये
12. मनुष्य आपले कर्तव्य व्यवस्थित रित्या पार पाडू शकतो जेव्हा –

• तो भगवंतांचे अधिपत्य स्वीकारतो.
• तो कृष्ण भक्त होतो
• सर्व काही कृष्णाच्या सेवेत सलग्न करतो
• फक्त शाकाहारी होण्यात समाधान न मानता फक्त कृष्ण प्रसाद ग्रहण करतो
• वेदांचे अधिपत्य स्वीकारून त्यांच्या आधारावर जीवन जगतो
• इशावास्यम तत्त्व स्वीकारतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो

मनुष्य जीवन जनावर
1. मनुष्य जीवन एक जबाबदारी आहे. 1. No जबाबदारी
2. मनुष्य जीवनाचे महत्व काय आहे आणि लक्ष्य आहे हे समजण्यासाठी प्रगत बुद्धी दिलेली आहे. 2आहार , निद्र भय आणि मैथुन ह्या गोष्टी कश्या कराव्या हीच बुद्धी दिलेली असते.
3. कुत्र्या मांजरा सारखे भांडण्यासाठी नाही. 3. संधी मिळताच भांडतात.
4. भगवंतांचा संदेश समजू शकतो 4. भगवंतांचा संदेश समजू शकत नाही.
5. प्रकृतीचे नियम तोडल्यास शिक्षेस पात्र असतो. 5. प्रकृतीचे नियम उल्लंघन करत नाही.
6. सर्व काही भगवंतांच्या सेवेत सलग्न करावे. 6. अशी अट लागू नसते.
7. प्रकृतीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पाप लागते. 7. कुठलेच पाप लागत नाही.
1.
2. – युद्धाचे कारण
• भगवंतांचा सर्व वस्तूंवर असणारा मालकी हक्क विसरणे किंवा झुगारणे.
• भगवंतांच्या मालकीच्या वस्तूंवर स्वतःचा हक्क गाजविणे.
• जे आपल्या हिस्स्यात आले आहे त्यात संतुष्ट न राहता दुसर्यांच्या गोष्टी हस्तगत करणे.
• बेकायदेशीर पणे दुसर्यांची मालमत्ता हडपणे.
• दुसर्यांना आवश्यक वस्तू न वाटता त्याचा बेकायदेशीर साठा करून ठेवणे.
• मुद्दाम प्रकृतीच्या नियमाचे उल्लंघन करणे.
• कुत्र्या मांजराप्रमाणे भांडणे
• कृष्णाच्या वस्तू त्यांनाच न अर्पण करणे.
• मनुष्य प्रगत बुद्धी आध्यात्मिक तत्त्वे समजण्यात उपयोग न करता भौतिक गोष्टी प्राप्त करण्यात वाया घालविणे.
• भौतिक गोष्टींशी जास्तीत जास्त आसक्त किंवा विरक्त होणे.
3. शांतीचे सूत्र
• आपण ज्या वस्तूंचा उपयोग करतो आहे त्या कोणाच्या आहेत हे आपल्याला माहिती हवे.
• वेदिक साहित्याच्या आधारावर आपण आपले आयुष्य जगायला हवे.
• भगवंतांनी आपल्याला जे काही दिले आहे त्यातच संतुष्ट राहणे.
• प्रकृतीच्या मालकीच्या वस्तूंवर स्वतःचा हक्क न गाजीविणे.
• दुसर्यांची मालमत्ता वापरणे म्हणजे चोरी आहे.
• इशोपनिषद यात दिलेल्या उपदेशांचे पालन करणे.
• कुत्र्या मांजराप्रमाणे न भांडणे
• कुठल्याही प्रकारे प्रकृतीच्या नियमाचे उल्लंघन न करणे.
• भगवंतांची कृपा म्हणून कृतघ्नतेपायी सर्व काही त्यांना अर्पण करणे.
• आपली चेतना आध्यात्मिक गोष्टीत वृद्धिंगत करण्यासाठी बुद्धीचा वापर करणे.
• आसक्ती आणि विरक्ती दोहोपासून दूर राहणे.