मंत्र ४

1. भगवंतांच अध्यात्मिक स्वरूप
2. कृष्ण हे शक्तिशाली देवतांच्याही आवाक्या बाहेर आहेत.
3. मानसिक तर्क वितर्काने कृष्णाला जाणणे अशक्य आहे.
4. फक्त भक्त भक्तीने भगवंतांना समजू शकतो.
5. भौतिक समस्यांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या स्वरूपाबद्दल, त्यांच्या विविध शक्तींबद्दल संपूर्ण माहिती असणे फार आवश्यक आहे.
6. कृष्णाची स्थिती जाणणे हे लोकांना का अवघड वाटते
7. भगवंत भौतिक मोजमाप आणि मानसिक तर्क वितर्क यांच्या पलीकडे आहेत.
8. जेव्हा ते स्वतः प्रकट होतात तेव्हाच आपण त्यांना बघू किंवा जाणू शकतो.
9. कृष्णाच्या विविध शक्ती
10. आपल्या सर्व शक्ती आपण भगवंतांच्या इच्छा पूर्तीसाठी उपयोगात आणायला हव्यात.
11. या मंत्रातील काही वैशिष्ट्ये
• कृष्ण सदैव आपल्या धामात असले तरी ते मनाच्या वेगापेक्षाही वेगवान आहेत.

• देवताही त्यांच्याशी सहज संपर्क साधू शकत नाही.
• एका जागी स्थित असतांनाही ते सर्वांवर नियंत्रण ठेवतात त्यात हवा आणि पाणी पुरविणाऱ्या दिग्गज देवतांचाही समावेश आहे.
• श्रेष्ठ्तेत भगवंत सर्वांना मागे टाकतात.
12. संपूर्ण ज्ञान म्हणजे भगवंतांचे स्वरूप, त्यांच्या विविध शक्त्या जाणणे आणि त्यांच्या इच्छेनुसार या सर्व शक्त्या कश्या प्रकारे कार्यरत आहेत हे जाणणे. भगवंत हे सर्व स्वतः भागवत गीतेत सांगतात. भागवत गीता म्हणजे सर्व उपनिषदांचा सार आहे.