दिव्य ज्ञान

अध्याय चवथा ज्ञानकर्मसंन्यासयोग ( दिव्य ज्ञान )
१) परंपरेचे महत्व सांगा? (४.२)
२) आत्मा-मायया या शब्दाचे महत्व स्पष्ट करा? (४.६)
३) कृष्णाच्या अवतरणासंबंधी सूर्याचे उदाहरण स्पष्ट करा? (४.६)
४) पृथ्वीवर कृष्ण का अवतरीत होतात? कारणे द्या?(४.६-८)
५) आध्यात्मिक मार्गावरील मुख्य तीन अडथळे कोणते ? आणि ते कसे दूर करता येतील? (४.१०)
६) सकाम कर्मी, निर्विशेश्वादी, योगी आणि भक्त यांच्याशी कृष्ण कसे व्यवहार करतात? (४.११)
७) देवता उपासकांची वृत्ती स्पष्ट करा? (४.१२)

८) वर्णाश्रम पद्धतीचे पाच घटक स्पष्ट करा?(४.१३)
अ) मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी वर्णाश्रम धर्म निर्माण करण्यात आला.
ब) चार विभाग … ब्राम्हण:- सत्वगुणी ..बुद्धिमान वर्ग , क्षत्रिय :- रजोगुणी …प्रशासकीय वर्ग , वैश्य:- मिश्र रजो आणि तम गुणी…व्यापारी वर्ग , आणि क्षुद्र:- तम गुणी…कामगार वर्ग ,
क)वर्णाश्रम धर्मात व्यक्तीचा वर्ण हा त्याच्या गुण आणि कर्मावर आधारित असतो,जन्मावर नाही.
ड) त्यात त्याचे हळुवार हृदय शुद्धीकरण होईल. वैष्णव:- हा सत्वगुणापलीकडे श्रीकृष्ण यांच्याबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा तो कृष्णाप्रमाणे मानवी समाजाच्या सर्व विभागाच्या अतीत अतीत होतो.
य) श्रीकृष्ण या वर्णाश्रमाचे आध्यात्मिक कर्ते असले तरी त्यांची गणना यात कुठेही होत नाही. ते सदैव भौतिक जगापासून अलिप्त असतात.भौतिक गुणांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही.

९)आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीची कुठलीही पाच लक्षणे सांगा? (४.१९-२३)
१०) कृष्ण भावनाभावीत कर्म स्पष्ट करतांना दुधाचे उदाहरण का दिले आहे? (४.२४)
११) सर्व यज्ञांचे पर्यवसन कशात होते? यज्ञाचा मुळ उद्देश काय आहे? (४.३३)
१२) कृष्ण अवतारांबद्दल मायावाद्यांना काय वाटते? (४.३५)
१३) दिव्य ज्ञानाची महिमा स्पष्ट करा? (४.३५-३८)
१४) श्रद्धाळू आणि संशयित व्यक्तींची गती स्पष्ट करा? (४.३९-४०)

१५) कृष्ण स्वतःबद्दल अर्जुनाला कुठले दिव्यज्ञान देतात?
• मी अजन्मा आहे , माझ्या दिव्य शरीराचा कधीच ह्रास होत नाही.
• जेव्हा पृथ्वीवर अधर्माचे वर्चस्व वाढते तेव्हा मी प्रत्येक युगात अवतरीत होतो. का?
• तर पुन्हा धर्म प्रस्थापन करण्याकरिता , भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता.
• जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप तत्त्वतः जाणतो तो देहत्याग केल्यावर परत या भौतिक जगात जन्म घेत नाही तर माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो.

१६) श्रीकृष्णांच्या काही अलौकिक स्वरुपांबद्दल माहिती द्या?
अच्युत:- भगवंतांचे कधीच पतन होत नाही, म्हणून ते भौतिक जगात असले तरी ते स्वतःबद्दलच्या त्यांच्या सर्व अवतरांबाबत सर्व गोष्टी लक्षात ठेवतात. आपल्यासारख्या जीवाला पूर्व जन्मीचे तर सोडा, काही दिवसांपूर्वीचेही आठवत नाही.
अद्वैत:- भगवंतांचे शरीर आणि आत्मा दोन्ही एकाच आहे म्हणून ते सर्व जाणतात.आपण शरीर सोडल्यावर आत्मा दुसरे शरीर धारण करतो कारण आपले शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत.
अव्ययम:- भगवंतांचे शरीर आणि बुद्धी कधीच निकृष्ट ( व्यय ) होत नाही आणि भौतिक जगात येऊन ते कधीच दुषित होत नाही.
असमऊर्ध्व:- कुठलाही जीव भगवंतांची बरोबरी करू शकत नाही आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ही होऊ शकत नाही.

१७) श्रीकृष्ण कोणत्याही कर्माने बद्ध होत नाहीत, उदाहरणासहीत स्पष्ट करा?
• भौतिक जगात राज्यांचे नियम राजाला लागू पडत नाही, तस्याच प्रकारे भौतिक जगाचे कुठलेच नियम भगवंतांना लागू पडत नाही. ते सदैव त्यापासून अलिप्त असतात. इतर जीव ह्या कर्म फळात बद्ध होतात.
• कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे मालक इच्छा करणार नाही.
• पाउसाशिवाय पृथ्वीवर कुठलीही वनस्पती वाढण्याची शक्यता नाही, तरी सर्व वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नसतो. काही झाड गोड फळ देतील तर काही कडू फळे देतील ते झाडांच्या स्वभावावर अवलंबून आहे ,त्यास पाउस जबाबदार नाही. भगवंत पाउसासारखे सर्वांसाठी समान आहेत. जीवांच्या विविध परीस्थितींसाठी भगवंत जबाबदार नाहीत.

१८) कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय यांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या?
• कर्म:- जो व्यक्ती भौतिक आसक्ती असल्या तरी शास्त्रांवर आधारित कार्य करतो, तो ते चांगले फळ भोगायला बद्ध राहतो.अशा व्यक्तींसाठी भगवंतांनी वर्णाश्रम धर्म प्रस्थापित केला आहे.
• विकर्म:- जो व्यक्ती सर्व भौतिक आसक्तींसहित शास्त्रांविरुद्ध कार्य करत असेल तर त्याला वाईट परिणाम भोगावालागतो.
• अकर्म:- जो निस्वार्थपणाने, शरणागत होऊन सर्व कार्य श्रीकृष्णांसाठी करतो , तो दिव्य आनंदाची प्राप्ती करतो आणि तो कुठल्याच प्रकारच्या फळाशी बद्ध राहत नाही.

१९) आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्यासाठी तीन आवश्यकता कुठल्या?
• आज्ञाकारक होवून गुरूंना शरण जाणे, विवेकशून्य किंवा काल्पनिक चौकशी करू नये.
• कुठलीही प्रतिस्ठा न बाळगता गुरूंच्या संतुष्टी साठी सेवा करणे
• इंद्रिय संयम ठेवून, श्रद्धा पूर्वक सर्व शास्त्रांचे नियम पालन करून सेवा करणे

२०) शरीरातील प्रमुख पाच प्रकारचे वायू कोणते आणि त्यांची कार्ये काय आहेत?
• प्राण-वायू:- इंद्रिय आणि विषय वस्तू यांच्यातील प्रतिक्रिया
• अपान वायू:- अधोगामी
• व्यान वायू:- आकुंचन आणि प्रसरण यांचे कार्य
• समान वायू:- समतोल राखतो
• उदान वायू:- उर्ध्वगामी
ज्ञानाची अवस्था :- म्हणजे व्यक्ती सर्व वायूंचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी करतो.