अध्याय ८ कुंतीदेवीच्या प्रार्थना

अध्याय ८ कुंतीदेवीच्या प्रार्थना
१-६ पांडवांच सांत्वन
मृतांना तर्पण देण्यासाठी पांडव द्रौपादिसोबत गंगा नदीवर जातात – स्नान करतात – अजूनही शोकग्रस्त आहेत – भगवान कृष्ण आणि इतर साधू आध्यात्मिक ज्ञान देवून त्यांच सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात- सर्व शक्तिमान नियतीचे अपरिवर्तनीय नियम आणि त्या नियमांच्या प्राणीमात्रांवर होणाऱ्या प्रतिक्रिया यांचा उल्लेख केला गेला – उदाहरणर्थ दुर्योधन आणि त्याचे समर्थक यांचा वध झाला आणि द्रौपदीचा अपमान केल्यामुळे इतरांचे आयुष्य कमी झाले- कृष्ण कृपेने युधिष्ठीर महाराज कौरवांचा वध करून त्यांचे राज्य हस्तगत करू शकले – कृष्ण युधिष्ठीर महाराजांना तीन अश्वमेध यज्ञ करण्यास आदेश देतात, जेणेकरून त्यांची कीर्ती इंद्राप्रमाणे सर्वत्र पसरेल.
राज्यात वैभवाची कारणे ( श्लोक ५ तात्पर्य , पाच मुद्दे )

८-१६ कृष्ण परीक्षित महाराजांना वाचवतात
नंतर कृष्ण उद्धव आणि सात्यकी समवेत द्वारकेस प्रस्थान करणारच – तेवढ्यात उत्तरा त्यांच्याकडे रडत धाव घेते आणि मदतीची हाक मारते – एक धगधगता बाण माझ्याकडे जोरात येतो आहे. माझा जीव गेलातरी चालेल पण माझ्या गर्भाचे रक्षण करा- कृष्ण (भक्त-वत्सल), शांतपणे तिची प्रार्थना ऐकतात (उपधार्य ) आणि त्याचे कारण जाणतात ,हे अश्वत्थामाचे कृत्य आहे –ब्रह्मास्त्राचे तेज बघताच पांडव आपली शस्त्र उचलतात – कृष्ण आपले सुदर्शन चक्र घेवून सुसज्ज होतात-आपल्या अचिंत्य शक्तीने ते उत्तराचा गर्भ झाकतात –भगवंतांची शक्ती ब्रह्मास्त्रालाही पराजित करू शकते- ते अजन्मा असूनही या भौतिक जगाचे पालन पोषण आणि संहार करतात ही आश्चर्याची गोष्ट मुळीच नाही- कुंतीदेवी ,पांडव आणि द्रौपदी कृष्णाला विनंती करतात.

१८- ४३ कुंतीदेवीच्या प्रार्थना
हे झाल्यावर आता भगवंतांनी अजून काही दिवस थांबावे म्हणून कुंती देवी प्रार्थना करतात.
तुम्ही माझे पुतणे नसून भगवान आहात १८-२०, तुमचा तुमच्या पालकांशी आणि इतरांशी संबंध – २१, शारीरिक वैशिष्ट्ये -२२, कुंतीचे वैयक्तिक आश्रयाचे अनुभव २३-२७, – भगवंताना समोर जाण्यास आवश्यक पात्रता २६-२९, त्यांच्या जन्म आणि कार्यांचा अचिंत्य स्वभाव -३०-३१, त्यांच्या जन्माबद्दल विविध अभिप्राय -३२-३५ , भक्तीची महिमा ३६, कृष्णाने अजून थोडे दिवस थांबावे म्हणून प्रार्थना- ३७-४० , वैयक्तिक प्रार्थना ४१-४३ , भगवंतांचा प्रतिसाद ४४
४५-५२ शोकग्रस्त महाराज युधिष्ठीर यांच्याशी भगवंतांचा संवाद