भिष्मदेवाचे महानिर्वाण

अध्याय ९ भिष्मदेवाचे महानिर्वाण

१-४ भिष्मदेवातर्फे सर्व महान व्यक्तींचे स्वागत
भिष्मदेवाचे पूर्ण जीवन अपयश – पण अंतिम समयी कृष्ण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.- पांडव सुखी आहेत ,युधिष्ठीर सम्राट झाले आहे , युधिष्ठिराचे सांत्वन भक्तातर्फे अशा अवस्थेत जेथे दुसरा व्यक्तीची बुद्धी कार्य करणार नाही –कितीही थोर योद्धा असेल अधर्माची बाजू घेतल्याने जिंकू शकत नाही आणि कृष्ण दर्शन, युधिष्ठीर महाराज इतर पांडव , व्यासदेव आणि धौम्य ऋषी समवेत भीष्मांना भेटायला जातात – कृष्ण आणि अर्जुनही त्यांच्या सोबत आहेत – सर्व जण भीष्माला वंदन करतात

५-११ भीष्मदेव शरीर सोडणार ही बातमी कळाल्यावर सर्व दिशेने मोठमोठे महान ऋषी त्यांना भेटायला येतात- देश काळ विभाग वीत म्हणजे प्रत्येक प्रसंगी कसे वागावे यात निपुण भीष्मदेव त्यांचे अशा बिकट प्रसंगी गोड शब्दांनी सर्वांचे स्वागत करतात ( प्रचारासाठी हा गुण खूप महत्वाचा असतो ) उदा. पारशी लोकांचा भारतात प्रवेश, श्रील प्रभुपाद आणि भक्तांचे पालक – भीष्मदेव बारा महाजनापैकी एक आहेत. शांत मनाच्या कार्यक्षमतेमुळे ते अंतःकरणपूर्वक सगळ्यांचे स्वागत करू शकले- (प्रभाव ज्ञ) कृष्णाचे स्वागत विशिष्ट पणे त्यांची योग्य महिमा गावून केले- पांडव त्यांच्या बाण शय्येसमोर शांत बसले होते- त्यांच्या बद्दलच्या प्रेमाने भीष्माचे हृदय स्नेहाने भरून आले-

१२-१७ भिष्मदेवाद्वारे पांडवांचे सांत्वन आणि प्रेरणात्मक उपदेश
(धर्म नंदना) साक्षात धर्माचे पुत्र असूनही तुम्ही किती कष्ट ,किती अन्याय सहन केला – ब्राह्मण सेवा, धर्म पालन आणि कृष्णाला शरणागती यांनी तुमचे रक्षण केले- या सर्व आपत्तीचे कारण आहे काळ – ज्याप्रमाणे मोठमोठे ढग वाऱ्याने वाहून नेले जातात त्याचप्रमाणे पूर्ण जग काळाच्या प्रभावाने नियंत्रित आहे- काळाच्या विरुद्ध कोणीच जावू शकत नाही- पांडवांकडे सर्व सामर्थ्य असूनही त्यांना विपत्तीला सामोरे जावे लागले- (न वेद विधीत्सितम ) भगवंतांची योजना कोणीही समजू शकत नाही (मुह्यन्तो कवयो अपी ही ) तत्त्वज्ञ ही हे समजण्यास गोंधळून जातात- म्हणून फक्त त्यांच्या इच्छे समोर नतमस्तक होवून त्याचे पालन करावे

१८-२४ कृष्णाची पूर्ण पुरुषोत्तम स्थिती प्रस्तुत करणे
श्रीकृष्ण अचिंत्य आहेत- भगवान साक्षाद , आद्यो नारायण , पुमान, मोहयन मायया लोकं गुढस चरती वृष्णीशु- भगवंतांची ही महिमा महाजनांच्या कृपेने आपण जाणू शकतो- ते त्यांचे कार्य जाणू शकतात पण त्यांची योजना कोणी जाणू शकत नाही. श्लोक २०- कृष्णाला साधारण व्यक्ती समजण्याची चूक करू नका कारण तुमच्याशी ते इतके जवळ आहेत की ही चूक होणे साहजिक आहे.
सर्वात्मनः , सम-दृशः तरी त्यांच्या एकनिष्ठ भक्तावर असीम कृपा म्हणून ते माझ्या अंत समयी मला त्यांचे साक्षात दर्शन देण्यास आले आहेत- भक्तीने भगवंत आपल्यासमोर प्रकट होतात आणि कर्मबंधनातून आपली सुटका करतात – मला भगवंतांना चतुर भूज रुपात बघायचं आहे- युधिष्ठीर महाराज भीष्मदेव यांना बरेच प्रश्न विचारतात.

२५-२८ राज्यकारभार कसा करावा यासंबंधी युधिष्ठिरास उपदेश
भीष्मदेव युधिष्ठिराला वर्णाश्रम, दान धर्म , राज धर्म, मोक्ष धर्म , स्त्री धर्म , भागवत धर्म , सर्व वर्ण आणि आश्रमातील व्यक्तींचे कर्तव्य काय आहेत या सर्वांबाबत उपदेश देतात. त्यासाठी ते इतिहासातील विविध प्रसंग वर्णन करतात.

२९-४३ भिष्मदेवाच्या अंतिम क्षणी कृष्णाला प्रार्थना
उत्तरायणाला सुरुवात होते- भिष्मदेवाच्या प्रार्थना – निबंध लिहा

४४-४९ भिष्मदेवाचे महानिर्वाण आणि त्यानंतरच्या घटना

प्रश्न
१) भिष्मदेवाने पांडवांच्या जीवनातील संकटांचे काय कारण सांगितले? (१४,१५,१६)
२) पांडवांना भिष्मदेवासमोर आणण्यामागे कृष्णाचा काय हेतू होता? अधर्माच्या गटात कितीही शूर योद्धा जिंकू शकत नाही , शुद्ध भक्त त्रिगुणातीत असतो.
३) जीवन अंती जर आपण श्रीकृष्णांचे चिंतन केले तर भगवत धाम प्राप्त होईल ,याची पुष्टी देणारे गीतेतील श्लोकांचे भाषांतर लिहा ? (३०)
४) भीष्मदेवांनी दिलेली मनुष्याचे नऊ गुण लिहा? आणि विविध वर्णांचे कर्तव्ये लिहा? (२६)