अध्याय दुसरा सांख्ययोग ( गीतेचा सार )

अध्याय दुसरा
सांख्ययोग
( गीतेचे सार )
योग- संबंध जोडणे होय. दुसऱ्या अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचे सारांश आहे.
भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायात एकूण ७२ श्लोक आहेत आणि त्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे
श्लोक १-१०:- अर्जुनाचे युद्ध न करण्याचे पाचवे कारण आणि भगवंतांकडून अर्जुनाच्या शंकांचे निरसन. श्लोक ११-३०:- ज्ञानयोग —– आत्मा व शरीर यांचा संबंध. श्लोक ३१-३८:- कर्मकांड —— स्वधर्माचे पालन करून भौतिक ऐश्वर्य प्राप्त करा. श्लोक ३९-५३:- बुद्धियोग —— कर्मफलाची अपेक्षा नको. श्लोक ५४- ७२:- स्थितप्रज्ञ —– ( समाधिस्त ) श्रीकृष भावनेमध्ये मन स्थिर करणे.
अर्जुनाच्या शंका आणि त्यांचे भगवंतांकडून निरसन.
 संजय म्हणाला: करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले.
 पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणाले: तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांत जाण्यात नाही, तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात.
 हे पार्थ! अशा हीन नपुंसकतेची कस धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप! उठ.
 अर्जुन म्हणाला: हे अरीसुदन! हे मधुसूदना! मला पूजनीय असणाऱ्या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन?
 महात्मासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते जेष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील.
 त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवशक्यता नाही. तरीदेखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोर उभे आहेत.
 माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितींत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारीत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा.
 ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही.
 संजय म्हणाला: याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, “ हे गोविंद! मी युद्ध करणार नाही” आणि स्तब्ध झाला.
 हे भरतवंशजा! त्या वेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण, खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले.
ज्ञानयोग विभाग
 पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणाले: पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्या योग्य नाही त्यबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाही.
 ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते अस काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार नाही.
 ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तरुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्युनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही.
 हे कौंतेया ! तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्याजाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा ! ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे.
 हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना ! जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे.
 जे तत्त्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, जे असत ( भौतिक शरीर ) आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत ( जीवात्मा ) आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरुपांचा अभ्यास करून तत्त्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे.
 जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही.
 अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा ! तू युद्ध कर.
 ज्याला वाटते की, जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारीत नाही आणि मारलाही जात नाही.
 कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्म नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.
 हे पार्थ ! जो व्यक्ती जाणतो की, आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील?
 ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून भौतिक शरीर धारण करतो.
 या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही.
 हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे.
 हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस.
 तथापि, जरी तुला वाटते की, आत्मा ( किंवा जीवनाची लक्षणे ) हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो ! तू शोक करणे योग्य नाही.
 जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यपालनात तू शोक करणे योग्य नाही.
 समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे?
 कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अदभूत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की, जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत.
 हे भरतवंशजा ! या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणिमात्रांसाठी तू शोक करण्याची आवशक्यता नाही.
कर्मकांड योग विभाग
 क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की, तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.
 हे पार्थ ! ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात.
 परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील.
 लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे.
 ज्या मोठमोठ्या महारथी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की, केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील.
 तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांत तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे?
 हे कौंतेया ! रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर.
 सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही.
बुद्धियोग विभाग
 आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. हे पार्थ ! जर तू या ज्ञानाचे आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील.
 या प्रयत्नात कोणतेही नुकसान नाही किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या, भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते.
 जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन ! जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात.
 अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ति इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रीयतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की, याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही.
 जे लोक इंद्रीयतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही.
 वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना ! या तीन गुणांच्या पलीकडे स्तिथ हो, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो.
 लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात.
 तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेत तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस.
 हे अर्जुना ! यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते.
 हे धनंजय ! भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावानेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत.
 भक्तिपूर्ण सेवेमध्ये सलंग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मांतील कौशल्य आहे.
 याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये सलंग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची ( भगवदधामाची ) प्राप्ती करतात.
 जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील.
 जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्म-साक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल.
स्थितप्रज्ञ ( समाधिस्त ) विभाग
 अर्जुन म्हणाला: हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा?
 श्रीभगवान म्हणाले: हे पार्थ ! मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होतो तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात, विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते.
 जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्हासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते.
 या भौतिक जगतामध्ये जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो.
 ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना, इंद्रियविषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो.
 देहधारी जीवात्मा जरी इंद्रियपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियविषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो.
 इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृनखल आहेत की हे अर्जुना ! इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाचा मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून घेतात.
 जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते.
 इंद्रियविषयांचे चिंतन करीत असताना, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उदभव होतो.
 क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते.
 पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्त्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो.
 याप्रमाणे संतुष्ट झालेल्या ( कृष्णभावनेमध्ये ) व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते.
 जो भगवंतांशी संबंधित नाही (कृष्णभावनेमध्ये ) त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मन स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांतीवाचून सुखप्राप्ती कधी होऊ शकेल?
 ज्याप्रमाणे सोसाटाच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ततः ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते.
 म्हणून हे महाबाहू ! ज्यांची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते.
 सर्व जीवांची जी रात्र असते, ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते.
 ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य, समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही.
 ज्या मनुष्याने इंद्रीयतृप्तींच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निःस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनेचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो.
 आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहीत होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवदधामात प्रवेश करू शकतो.

अध्याय दोन ( 2) नोटस्

१) परमसत्याच्या तीन अवस्थांचे सूर्याच्या दिव्य स्वरूपानुसार वर्णन करा?
परमसत्याचे ज्ञान असणारे परमसत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमद्धे करतात आणि या सर्व एकच आहेत. परमसत्याच्या अशा अवस्थांना ब्रम्ह, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते.ही तीन दिव्य स्वरूपे आहेत, उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्रार्थमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे, जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकांमध्येच प्रवेश करतो तो अधिक सर्वश्रेष्ठ आहे.
२) भगवान शब्दाचे वर्णन करा?
भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण, व्यासदेवाचे पिता, महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे.i) संपूर्ण ऐश्वर्यii) संपूर्णबलiii) संपूर्ण यशiv) संपूर्ण सौंदर्यv) संपूर्ण ज्ञान आणिvi) संपूर्ण वैराग्ययांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वास भगवान असे म्हटले जाते.

३) आर्य कोणास संबोधले जाते हे स्पष्ट करा?
आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणार्याि समाजातील व्यक्तींनाच आर्य असे म्हणतात.

5) मनुष्याला आध्यात्मिक गुरुकडे जाणे का आवश्यक आहे?
स्वभावतःच प्रकृतीचा भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकालाच गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिति आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येयप्राप्ती बद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणार्याू प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवायही घडणारर्याग जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणार्या जंगलातील वणव्या प्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिति अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो तरी तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो, म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की, जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात या बद्दल ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरांतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे.

6) कृपण कोणास म्हटले जाते?
मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या-मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय.
7) खरा आध्यात्मिक गुरु कोण?
जो पुर्णपणे श्रीकृष्णभावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे कारण तो जीवनातील सर्व समस्या सोडवू शकतो.

8) श्रील प्रभूपाद मायावादाचेखंडन कसे करतात हा सारांश थोडक्यात लिहा?
मायावादी लोक ३ युक्तिवाद देतात. a) आत्मा भगवंतांपासूनवेगळा झाला असल्यामुळे भगवंत आपले स्वरूप या विभाजनामुळे गमावून बसले आहेत? पण प्रभुपाद म्हणतात :- अस शक्य नाही कारण आत्मा हा कधीच तोडल्या जाऊ शकत नाही ( गीता २.१३ आणि २.२३) . आणि सर्व आत्मे भगवंतांपासून सनातन काळापासून त्यांच्या सेवेसाठी विस्तारित झाले आहेत आणि भगवंत सदैव त्यांच्या दिव्य रुपात भगवत धामात लीला करत आहेत.
b) मुक्तीनंतर आत्मा भगवन्तांमध्ये विलीन होतो आणि आपला स्वतंत्र अस्तित्व गमावतो?पण प्रभुपाद म्हणतात:- आत्मा कधीच कशातच विरघळू शकत नाही.(गीता २.२४). चंद्र आणि तारे पाण्यात प्रतिबिंबित होतात तरी आकाशात आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी त्यांच स्वतंत्र अस्तित्व असत. आणि आत्मा हा सदैव अस्तित्वात असतो , पूर्वी होता, आत्ता आहे आणि भविष्यातही अस्तित्वात राहणारच.(गीता २.१२)
c) आत्मा सो परमात्मा , आत्मा आणि परमात्मा एकच आहे ?पण प्रभुपाद म्हणतात:-आत्मा कधीच परमात्मा होऊ शकत नाही. भगवंत असम-ऊर्ध्व आहेत , कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही आणि कोणीही त्यांच्या पेक्षा उत्तम नाही. जर ते दोघेही एकच असते तर एकाने दुसऱ्याला भगवत गीता शिकवायची गरजच नव्हती.चंद्र आणि तारे पाण्यात प्रतिबिंबित होतात तरी आकाशात आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी त्यांच स्वतंत्र अस्तित्व असत.
9) धीर मनुष्य कोणाला म्हटले जाते?
ज्या मनुष्याला जिवाची मूळ स्थिति, परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला ‘धीर’ किंवा ‘ज्ञानी’ मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीही गोंधळून जात नाही.

10) आत्म्याचे पाच गुणधर्म स्पष्ट करा? (२.१७)
i) प्रत्येक व्यक्ति वैयक्तिक आहे. आत्मा सदैव भगवंतांचा अंश आहे.
ii) कधीच मरत नाही, नाश होत नाही.
iii) भौतिक मोजमाप करू शकत नाही.
iv) यांच्यात कधीच बादल होत नाही.(स्थिर)
v) अचल आहे, सदैव टिकणारा आहे.
vi) अस्थित्व हृदयात आहे.
vii) हा आजन्म आहे, सनातन आहे.
viii) तो अदृश्य आहे, अचिंत्य आहे, कुठल्याच मानवी प्रयोगाद्वारे जाणला जाऊ शकत नाही. वैयक्तिक चेतना हे लक्षण आहे. फक्त शस्त्रांद्वारे आकलन होते. तो संपूर्ण शरीरात व्याप्त आहे.

11) ‘जर जिव हा कधीही मारला जाऊशकत नाही तर आपण आपल्या इच्छेने इतर कोणालाही मारू शकतो’ या वादाला आव्हान द्या? (२.१९)
उपरोक्त विचार हा शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजन देत नाही. ‘मा हिंस्यात सर्वा भूतानि’ कोणाचीही हिंसा करू नये हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशूहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या कारणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरीखातर नव्हे तर धर्म तत्त्वाकरिता नियुक्त करण्यात आले होते.

1२) भौतिक शरीराची सहा स्थित्यंतरे कोणती?
i) शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते.
ii) काही काळासाठी राहते.
iii) त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात. (उत्पत्ती).
iv) हळूहळू त्याची झीज होते.
v) शेवटी लुप्त होते. (मृत्यू)

13) हिंसेचा व्यवस्थित वापर हा ज्ञानी व्यक्तींच्या हातात असतो?हे उदाहरण देऊन स्पष्ट करा? i) प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा उपयोग कुठे कसा करावा हे जाणतो त्याचप्रमाणे हिंसेचिही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तींवर अवलंबून असते.
ii) जर खुनाबद्दल अपराधी असणार्याी एका व्यक्तिला, न्यायाधीशाने मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो संहितेनुसार दुसर्याकव्यक्तिला शिक्षा फर्मावतो.
iii) खुनी व्यक्तिला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी ‘मानू-संहितेत’ करण्यात आली आहे. कारण असे केल्यामुळे त्याने पूर्व जन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दु:खं: भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारक आहे.

14) एकाचवृक्षावर दोन मित्र पक्षी बसलेले आहेत हे उदाहरण देऊन स्पष्ट करा?.
मुण्डकोपनिषद तसेच श्वेताश्वतरोपनिषद यांसारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्रपक्ष्याबरोबर करण्यात आली आहे. त्यापैकि एक पक्षी (अणुरूप जीवात्मा ) वृक्षावरची फळे खात आहे आणि दूसरा पक्षी (श्रीकृष्ण) आपल्या मित्रांच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जारी ते मित्र असले तरी त्यांमधील एकजण स्वामी आहे आणि दूसरा सेवक आहे. आत्म्याचे यांसंबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षवरून दुसर्याज वृक्षावर किंवा एका शरीरमधून दुसर्याा शरीरामध्ये होणार्या् स्थानांतरास करणीभूत ठरते.

15) आत्म्याचे आश्चर्यकारक म्हणून का वर्णन केले आहे?
एकाच आकाराचा आत्माएखाद्या महाकाय जनावराच्या शरीरात उदा हत्तीच्या, एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि एक इंच जागेत असणार्याय कोट्यावधी जीवजंतूमध्येही असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे.

16) व्यवसायत्मिका बुद्धी म्हणजे काय?
कृष्णभावनेदवारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते या विश्वासालाच व्यवसायत्मिका बुद्धी म्हटले जाते.

18) मुनी आणि स्थितधी मुनी यांमधील फरक काय?
मुनि शब्द दर्शवितो की, जो मानसिक तर्कवितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. स्थितधी: मुनी हा नेहमी कृष्णभावनाभवित असतो कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पुर्णपणे त्याग केलेला असतो. तो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो.

19) स्थितप्रज्ञ असलेल्या व्यक्तींचे काही गुणधर्म सांगा?
स्थितप्रज्ञ मानुष्य विविध तापांनी मुळीच सूक्ष्म होत नाही, कारण तो सर्व दु:खांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की, आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळेच आपण केवळ आणखी त्रासासाठी लायक आहोत तरीसुद्धा भगवंतांच्या कृपेमुळे आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत.
जेव्हा त्याला सुख येते तेव्हा तो म्हणतो की भगवंतांच्या कृपेमुळेच मला हे सुख प्राप्त होत आहे अन्यथा मी या सुखाला अपात्र आहे. भगवंतांच्या कृपेमुळेच आपण या सुखकारक परिस्थितीत राहून भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करतो.
भगवंतांच्या सेवेप्रीत्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तो आसक्ती आणि अनासक्तीयामुळे कधीच प्रभावी होत नाही, यश असो व अपयश, कृष्णभावनाभवित मानुष्य हा नेहमी आपल्या संकल्पनांमध्ये दृढ असतो.
जो भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टींपासून निर्विकार राहतो व कृष्णभावनाभावनेत दृढपणे स्थिर होत राहतो.

20) आध्यात्मिक प्रगतीपासून पतन होण्याची कारणे सांगा?
जो कोणी कृष्णभावनभवित नाही तो कृत्रिम रितीने इंद्रियदमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो, कारण विषयसुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रियतृप्तीसाठी उपयुक्त करू शकतो.
इंद्रिय विषयीचे चिंतन करीत असताना, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तिने काम उत्पन्न होते आणि मोहा पासून स्मृति भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते.