ऋषींचे प्रश्न

श्लोक १:- परम सत्याच्या व्याख्या :-

ओम नमो भगवते वासुदेवाय :- परम सत्य म्हणजे देवकी आणि वसुदेव यांचे पुत्र श्रीकृष्ण आहे.
जन्माद्य अस्य यतः:- ते सर्व वस्तूंचे उगम स्थान आणि सर्व कारणांचे आदि कारण “
पुरावे : – मतः परतरं नान्यत किंचित असती धनंजय..(गीता ७.७), इशोपानिषद :- भगवंत असमोर्ध्व आहेत.
उदा.
१) तुलना :- शास्त्रज्ञाची बुद्धी- अंतराळात उपग्रह निर्माण करणे आणि भगवंतांची बुद्धी:- असंख्य तारे आणि ग्रह अनंत काळापासून अंतराळात तरंगत ठेवणे….
२) कृष्ण:- स्त्री आणि पुरुष यंत्र निर्माते आणि भौतिक संशोधक किचकट यंत्रणा असलेले घड्याळ निर्माते
( मायावादी तत्वज्ञान :- सृष्टीचा कोणी निर्माता नाही याचे येथे खंडन करण्यात आले आहे )

-कृष्णाच्या अलौकिक लीला १० व्या स्कंदात आहेत, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी क्रमाक्रमाने पहिल्या स्कंदापासून नवव्या स्कंदापर्यंत अध्ययन करणे आवश्यक आहे.तसे न करता पहिल्यापासूनच १० वा स्कंद वाचला तर निश्चितपणे श्रीकृष्णाबद्दल आपल्याला गैरसमज होऊ शकतो.
३) भगवंत श्रुष्टीची निर्मिती फक्त प्रकृती वर एक कटाक्ष टाकून करतात.
४) भगवंतांच्या संशोधनात कुठलीच तृटी आढळून येत नाही. अशा भगवंतांना जो शरण जातो तो महात्मा म्हणून प्रसिद्ध होतो. म्हणून सर्वांनी महात्मा होण्याचा प्रयत्न करावा असे श्रील प्रभुपाद तात्पर्यात सर्वांना विनंती करत आहेत.
अन्वयाद इतरेश्च अर्थेषु अभिज्ञ:- भगवंत हे प्रत्यक्ष (परमात्मा )आणि अप्रत्यक्ष्यपणे (देवतांमार्फत ) या संपूर्ण सृष्टीचे जाणकार आहेत.
उदा.चीफ इंजिनिअर चीफ इंजिनिअरला त्यांनी बनवलेल्या किचकट बिल्डिंग मधल्या काना कोपऱ्याचे ज्ञान असते.
– ज्याप्रकारे आपल्या कुठल्या अंगाला चिमटा काठला तर आपल्याला लगेच माहिती पडत तसेच प्रकृतीत ज्याकाही घडामोडी होतात त्या भगवंतांना माहिती होतात.

स्वराट:- भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत.ब्रह्मदेव ते मुंगी सर्व जीव हे लहान मोठे निर्माते आहेत तरी कोणीही स्वतंत्र नाही. उदा- 1) रसायन शास्त्रज्ञ पाणी निर्माण करतो पण h२ आणि o२ कुठून घेतो,
उदा. २) प्रभुपाद आणि काच निर्माता संवाद – वाळू चोर.
भगवंत एकाच वेळेस भिन्न आणि अभिन्न आहेत.
तुलना -सोन्याची खाण आणि सोन्याचे अलंकार , भगवंत आणि जीव ,गुणात्मक दृष्ट्या एक आहेत आणि परीणामात्मक दृष्ट्या भिन्न आहेत.
तेने ब्रह्मा हृदय आदि कवये :- त्यांनीच वेदिक ज्ञान सर्व प्रथम ब्रम्हदेव यांना त्यांच्या हृदयात प्रदान केले.
मुह्यन्ति यत सूरयः :-त्यांच्या माया शक्तीने देवता आणि ऋषी मुनीही भ्रमित होतात. पुरावा:- न मे विदुः सुरगणाः गीता (१०.२ )
तेजोवारी मृदाम यथा:- ज्याप्रमाणे अग्नीत पाणी आणि पाण्यात जमिनीचा भ्रम होतो.
विनिमयो यत्र त्रीसर्गो अमृषा:- त्यांच्यामुळेच भौतिक गुणांच्या प्रभावाने निर्माण झालेली ही ब्रह्मांडे अशाश्वत किंवा तात्पुरती असूनही आपल्याला शाश्वत वाटतात.
उदा.ज्याप्रमाणे वाळवंटात मृगजळाचा भास होतो. भौतिक सुख म्हणजे उदा. खीर आणि विषाचा थेंब
धामनाम स्वेन सदा निरस्त कुहकम :- भगवंत सदैव आपल्या शाश्वत धामात (जिथे मायेचा प्रभाव नसतो) नित्य लीला करतात.
सत्यं परम धीमही :- मी अशा परम सत्यावर ध्यानस्थ होतो.
श्लोक दुसरा :-
धर्मः प्रोजीतः कैतवो अत्र:- श्रीमद भागवतंमध्ये भौतिक हेतूने प्रेरीत कुठल्याही प्रकारच्या धर्मांचा समावेश नाही. (धर्म,अर्थ काम आणि मोक्ष यांचाही यात समावेश नाही)
भागवतम भौतिकवादी इच्छांनी प्रेरित सर्व धर्म कार्यांचा त्याग करून फक्त परम सत्याला सादर करते. इथे खरा धर्म तथाकथित धर्मापासून वेगळा केला गेला आहे. १) खरा धर्म हा ४ पुरुषार्थान पलीकडे आहे. २) कारण फसवणूक करणारा धर्म म्हणजे ज्यात फक्त धर्म, अर्थ, काम ,आणि मोक्ष यातच भर दिला जातो. हे ४ पुरुषार्थ इंद्रिय तृप्तीचे वेगवेगळे स्थर असून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या जीवाच्या प्रयत्नाला प्ररणा देतात. परमो :- परम सत्य प्रस्तुत केले आहे.
निर्मत्सरानाम सताम वेद्यं:- हे शास्त्र फक्त निर्मत्सरी शुद्ध भक्तांसाठीच आहे. फक्त शुद्ध भक्त हाच श्रीमद भागवतमचा मर्म समजू शकतो.
वास्तवम वस्तू:- शिमद भागवतं वास्तवता आणि माया यातील फरक प्रस्तुत करते. यात सर्वांच्या कल्याणाकरिता फक्त परम सत्याला प्रदर्शित केले आहे
शिवदम :- हे शास्त्र सर्वांच्या कल्याणार्थ आहे.
ताप –त्रयोनमुलनम :- हे शास्त्र त्रीतापाचे निर्मुलन करते.
महा मुनी कृते :- व्यासदेवांनी नारद मुनींच्या मार्गदर्शना नंतर या श्रीमद भागवतंचे संकलन केले आहे.
किम वा परेर :- हे शास्त्र असतांना इतर शास्त्रांची काय आवश्यकता?
ईश्वर सद्यो हृद्य अवरुध्यते कृतीभिः शुश्रुशुभीस तत क्षणात:- जर आपण श्रीमद भागवत लक्षपूर्वक आणि नम्रतेने श्रवण केले तर , लवकरच आपल्या हृदयात भगवंत प्रवेश करतील.
भागवतम समजण्यासाठी एकाग्रतेने श्रवण करणे खूप आवश्यक आहे. क्रीतिभिः :- पूर्व जन्मांचे पुण्य असेल तरच आपण भागवतम खऱ्या प्रकारे ऐकू शकतो आणि शुश्रुभिः :- भागवत ऐकतांना नम्रपणा आणि एकाग्रता ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
कुठल्याच प्रकारची अहंकारी वृत्ती कामाची नाही. भक्ती खूपच सोपी पद्धत आहे पण त्याला प्रयोगात आणणे खूप कठीण आहे. कारण लोक एकतर भागवत कथा ऐकण्यास आळस करतात किंवा सहनशीलता सोडून थेट दहावा स्कंद वाचतात.
श्लोक ३ :- ज्याप्रमाणे पिकलेला आंबा झाडावरून काढतांना खूप सावधतेने काढला पाहिजे तश्याच प्रकारे भागवतम जे परिपक्व पुराण आहे त्याचे श्रवण धैर्याने , नम्रपणे , आदराने आणि लक्षपूर्वक करायला हवे. शुक मुखाद अमृत द्रव्य सम्युतम
जेव्हा एखाद्या आंब्याला पोपटाने आधीच चोच लावली असेल तर तो आंबा जास्तच गोड होतो त्याच प्रकारे भागवतं हे प्रथम शुकदेव गोस्वामींनी गायल्यामुळे अधिकच गोड आणि परिपूर्ण झाले आहे.
रसाची व्याख्या:- रसाचे ५ मूळ प्रकार आहेत – शांत , दास्य,साख्य ,वात्सल्य,माधुर्य आणि
७ विस्तारित प्रकार आहेत – हास्य , अद्भुत, वीर्य , करुणा, क्रोध, भयानक (भीती), बीभत्स .
भगवंत हे सर्व रसांचे उच्चांक रसाधीपती आहेत.जेव्हा जीव भगवंतांबरोबर आपल्या शाश्वत संबंधात रसाचे आदान प्रदान करतो तेव्हा तो शाश्वत आनंदाची प्राप्ती करतो.
श्लोक ४-८ :-
४ .ऋषी मुनींची भावना :- सर्व सामान्य व्यक्तीच्या कल्याणार्थ सदैव चिंतीत राहणे.म्हणून ते सर्व एकत्र येवून भगवंतांना प्रसन्न करणार होते.
उदा. वेदिक संस्कृती – झाड्याच्या मुळात पाणी टाकणे आणि पाश्च्यात्य संस्कृती – त्याच्या फांद्यांना पाणी टाकणे. पाश्च्यात्य संस्कृती ही झाडापासून वेगळ्या झालेल्या फांद्यांप्रमाणे आहेत त्यांना कीतीही पाणी टाकले तरी त्या सुकणारच आहेत.
नेमिशारण्य याचे महत्व १) वायविय तंत्र :- ब्रह्मांडाचे केंद्रीय स्थान म्हणून वर्णन केले आहे. २) वराह पुराण :- या ठिकाणी केलेल्या यज्ञाने आसुरी प्रव्रीत्तींचा नाश होतो.
वायवीय तंत्र:- ब्रह्मदेवाने जेव्हा हे विशिष्ट ब्रह्मांड निर्माण करण्याचा विचार केला तेव्हा त्याला कुंपण घालणारे चक्र कसे असेल यावर चिंतन केले आणि त्या वर्तुळाचा केंद्र बिंदू त्यांनी या नैमिषारण्य तीर्थक्षेत्राला बनविले. याचा अर्थ काय? जे काही पुण्य यज्ञ कार्ये येथे होतील त्याचा परिणाम आपोआप सर्वत्र पसरेल.
वराह पुराण:- या ठिकाणी यज्ञ केल्याने राक्षसी लोकांची शक्ती कमी होते म्हणून सर्व साधूंनी येथे यज्ञ करणे पसंत केले.
उदा.झाडांची पाने आणि फांद्या झाडापासून वेगळे जिवंत राहू शकत नाही. सर्वांसाठी विष्णू यज्ञ अत्यावश्यक.
५. कली युगात विहित यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ , ज्याने जीवाला पूर्ण शांती आणि आनंद प्राप्त करू शकतो.
भक्त भगवंतांच्या आनंदासाठी सर्व यज्ञ करतात आणि सर्व प्रकारच्या सेवांना आसक्त असतात. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीला आसक्त असतात.
६. सुत गोस्वामिंची पात्रता:- (अनघ) सर्व प्रकारच्या अवगुणांपासून मुक्त आहेत. (कली युगातले ४ अवगुण त्यांच्यात नव्हते ), सर्व शास्त्रामध्ये आणि तत्त्वज्ञानामध्ये पारंगत आहेत, त्यावर (अधितानी )अध्ययन आणि (आख्यातानी)व्याख्यानही केले आहे, इंद्रिय संयम आणि परंपरेतील आचार्यांच्या मार्गावर चालणे , सर्व सेवा काळजीपूर्वक करणे,
७. तुम्ही सर्व शास्त्रांचे ज्ञानही जाणता(वेद-विदा). वयोवृद्ध आहात (श्रेष्ठा)
८. नम्र (सौम्य) आणि शरणागत ( स्निग्धस्य=श्रद्धायुक्त) असल्याकारणाने तुम्ही गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त केली आहे. खर यश हे गुरूंच्या संतुष्टीत आहे ज्याने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून आता ते ज्ञान आम्हाला कथन करा.
श्लोक ९-२३
हे सगळ ऐकल्यानंतर सुत गोस्वामी कथा करण्यास मान्य करतात पण ऋषी इशारा देतात की फक्त भागवत कथा सांगा. ते म्हणतात की कली युगात आयुष्य खूप कमी आहे, म्हणून तुम्ही भगवंतांबद्दलच कथा करा.
९ पहिला प्रश्न :- सर्वसामान्य व्यक्तीसाठी सर्वात श्रेयस्कर काय आहे? ( पुंसां एकांततः श्रेय )
१०. कली युगातील मनुष्याचे गुणधर्म :-
१) कमी आयुष्य :- आपल्या ४ सवयी आपल आयुष्य कमी करतात.
२) आळशीपणा :- मनुष्य जीवन मोठ असल तरी आपण या जगाबद्दल, भगवंतानबद्दल, मनुष्य जीवन कशा प्रकारे सफल करता येईल याबद्दल ऐकण्यास आळस दाखवतो.
३)योग्य मार्गदर्शनाचा अभाव :- पाश्च्यत्य पद्धतीत शाळेत शरीराबद्दलच ज्ञान दिले जाते. फक्त या जन्मात ऐश्वर्य कसे प्राप्त करावे हेच शिकविले जाते.
४) अभागी (दुर्दैवी) :- चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केलाही तरी इंद्रिय तृप्तीचे सर्वीकडे प्रचंड प्रमाणात प्रलोभन उपलब्ध आहे.

५) सदैव चिंतीत :- जरी चांगली संगत मिळाली तरी ते बऱ्याच प्रकारे चिंतीत असतात.
अनेक शास्त्रे अनेक हेतू आणि ती समजायला अनेक वर्षे अभ्यास हे या अभागी व्यक्तींना शक्य नाही म्हणून
११ दुसरा प्रश्न:- सर्व शास्त्रांचा सार काय आहे तो सांगा? ज्याने सर्व त्रस्त जीवांना संतुष्टी लाभेल.
१२ तिसरा प्रश्न :- भगवान श्रीकृष्ण यांचे वासुदेवांचे पुत्र म्हणून जन्म घेण्याचे कारण काय?
भगवान षड ऐश्वर्य पूर्ण आहेत.भागवत कथा ऐकण्यास उत्साह ही पहिली आवश्यकताआहे.
१३ ते १७ यात ऋषी हरी नाम आणि भक्त यांची महिमा गावून सुत गोस्वामींना त्यांची उत्सुकता दर्शवितात.
१४ भगवंतांचे नाम हे त्यांच्या रूपाशी अभिन्न आहे.
१५ भक्तांची महिमा:- गंगा स्नान आणि भक्तसंग यांची शुद्ध करण्याची कालावधीनुसार तुलना .
१६ भागवत कथा श्रवण आणि कथन ही सोपी पद्धत आहे ज्यांनी कलीचा प्रभाव टळू शकतो.
१७ चौथा प्रश्न :- भगवंतांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्ती समयी केलेल्या लीलांचे वर्णन ? (३ पुरुषावतार)
१८ पाचवा प्रश्न:- श्रीकृष्णाच्या विविध अवतारांच्या लीलांचे वर्णन? ( लीलावतार )
१९-२२ परत ऋषी आपल्या उत्साहाबद्दल सांगतात.
१९ श्रीकृष्ण लीला श्रवणात तृप्ती नाही.
२० श्रीकृष्ण आणि बलराम यांनी केलेल्या अतिअद्भुत लीला सदैव मनाला संतुष्ट करतात
२१ आम्ही हे सर्व विस्ताराने ऐकण्यास तयार आहोत.
२२ कलियुग रुपी महासागर पार करण्यास तुम्ही(सुत गोस्वामी) आमचे कर्णधार आहात.
२३ सहावा प्रश्न :- श्रीकृष्ण भगवतधामात परत गेल्यावर धार्मिक तत्त्वांनी कोणाचा आश्रय घेतला?

सराव प्रश्न
१) परम सत्याची व्याख्या द्या?
२) नैमिषारण्य या तीर्थक्षेत्राचे महत्व लिहा?
३) श्रीमद भागवतंचे वैशिष्ट्य स्पष्ट करा?
४) सुत गोस्वामिंची भागवत वक्ता होण्याची पात्रता स्पष्ट करा?
५) कलियुगातील व्यक्तीची लक्षणे लिहा?
६) कलियुगात सर्वांचे आयुष्य कमी असण्याचे खरे कारण काय आहे?
७) गंगेच्या पाण्याचा संपर्क आणि भगवंतांच्या भक्ताचा संग ही तुलना स्पष्ट करा?