नारदागमन

स्कंद पहिला अध्याय ४ नारदागमन

१-८ :- शौनक ऋषींचे पुढील प्रश्न

१ अध्यक्ष्याची पात्रता:- अ)वृद्धः :- वरिष्ठ ब) कुल-पतिः – सभेचे सभापती क) बहु-ऋच :- विद्वान

२ शौनक ऋषी भागवतं ऐकण्याची उत्सुकता दर्शवतात:- सुत सुत …
३ प्रश्न १ :- भागवतं चा इतिहास :- कोठे, कोणी, कधी आणि कोणाच्या प्रेरणेने भागवतं लिहिण्यात आले?(उत्तर:- १.४-७)

४-८ :- प्रश्न २ :- शुकदेव गोस्वामी संबंधी :-
६ :-हस्तीनापुरीतील प्रजेने शुकदेव गोस्वामींना कसे ओळखले?
७ :- महाराज परीक्षित त्यांना कसे भेटले? एक सम्राट एका वैराग्याशी सात दिवस का भेटले? ( उत्तर १.१८-१९ )
शुकदेव गोस्वामिंचे गुण:-
महायोगी- महान भक्त , सम-दृक निर्विकल्पकः – समदर्शी , एकांत-मतिः – एकाग्र चित्त असणारे , उन्निद्रः गुढः – भौतिक कार्यांच्या पलीकडे , मूढः इवेयते – अस्तित्व सहज सहजी न समजणारे , स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक करत नाही , विरक्त – गायीचे दुध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ कोणाच्या घरी थांबत असत.

९-१३ महाराज परीक्षित यांच्या संबंधी माहिती
९:- प्रश्न ३:- महाराज परीक्षित यांचा जन्म आणि कार्ये? (उत्तर :- जन्म( १.७-१२ )कार्ये (१.१३-१७ )
१०:- प्रश्न ४ :- महाराज परीक्षित सम्राट पद त्याग करून गंगे तीरी आमरण उपोषण करायला का बसले? (उत्तर १.१८-१९ )
११ :- युवा आणि शक्तिशाली राजा त्याग का करतो आहे?
१२:- तो भोगी किंवा स्वार्थी नव्हता तर परोपकारी होता, तरी राज्यत्याग का केला?
१३:- तुम्ही या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास समर्थ आहात कारण काही भाग वगळता तुम्ही सर्व वेद जाणता.

१४-२५ व्यासदेवांद्वारे वेदांचे विभागीकरण
१४:- पराशर पुत्र
१५-१६ सरस्वती नदीच्या तीरी ध्यानस्थ बसले असतांना त्रिकालदर्शी व्यासदेव कली युगातील विसंगती दर्शविणारे दृश्य बघू शकतात.
१७-१८ :- भौतिक गोष्टींचा ह्रास होत असल्याचे बघितल्यावर समाजातील सर्व वर्ण आणि आश्रमातील लोकांच्या कल्याणार्थ त्यांनी मनन केले.
१९. वेदांचे चार भाग केले.
२०. इतिहास आणि पुराण यांच्यातील अधिकृत कथांना पंचम वेद म्हणून घोषित केले.
२१-२२ :- ऋग – पैल , साम – जैमिनी , यजुर – वैशंपायन , अथर्व- अंगिरा , पुराणे – रोमहर्षण
२३:- त्यांनी त्यांच्या शिष्यांना यावर परत विस्तार करण्याचा आदेश दिला.

२४-२५:- अज्ञानी लोकांवर दया आल्याने त्यांनी त्यांच्या उद्धाराकरिता वेदांचे संपादन आणि महाभारताचे संकलन केले जेणेकरून त्याचा उपयोग करून स्त्री , शुद्र, द्विज बंधू मोक्ष गाठू शकतील.
२६-३१ तरीही व्यासदेव असंतुष्ट
२६-२७:- आपल्या असंतुष्टीचे कारण शोधण्यासाठी व्यासदेव आत्मपरीक्षण करतात.
२८-३१:- कारणे:- धृत व्रतेन , निर्व्यलीकेन , अनुशासनम , वेद संकलन सर्व काही असतांना असंतुष्टी म्हणजे शुद्ध भक्तांना आणि भगवंतांना प्रिय प्रेममय भक्तीचे विशेष वर्णन न केल्याने असेल.

३२-३३ नारदागमन
व्यासदेव नारदांचे स्वागत साक्षात ब्रह्मदेवाच्या स्वागतासारखे करतात.