अवतारी कृष्ण

तिसरा अध्याय :- अवतारी कृष्ण

१.३.१-५:- महत-तत्त्व व्याख्या आणि प्रत्येक ब्रह्मांड निर्माणात तीन पुरुषावतारांची भूमिका
१.३.६-२७ :- भगवंतांच्या असंख्य अवतारांपैकी २२ अवतारांची माहिती.
१.३.२८-२९ :- सर्व अवतार श्रीकृष्णांचे अंश किवा कला अवतार आहेत. कृष्ण अवतारी आहेत आणि साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत.
१.३.३०-३९:- विराट रूप.
१.३.४०-४४ :- श्रीमद भागवतमची महिमा:- कली युगातील बद्ध जीवांच्या उद्धारासाठी एकमात्र साधन, शास्त्र रुपात कृष्णाचा अवतार आहे.

कृष्ण आणि त्यांचे विस्तार
श्रीकृष्ण
स्वयम रूप:- वृंदावनातील गोपाल

स्वयम प्रकाश :- त्यांचे स्वतःचे (विस्ताररूपी)प्राकटीकरण
1) प्रभाव प्रकाश :- रास लीला आणि द्वारकेतील लीलांसाठी असंख्य रुपात केलेला विस्तार.

2) वैभव प्रकाश किंवा तद-एकात्म रूप :- विविध भावना आणि शरीर वैशिष्ट्य प्रकट करणारे विस्तार उदा.
बलरामजी

अ) विलास :- विष्णूंच्या रुपात बलरामजींचा विस्तार
पहिले चतूर-व्यूह (वासुदेव,संकर्षण ,प्रद्युम्न , आणि अनिरुद्ध)
दुसरे चतुर-व्यूह (वासुदेव,संकर्षण ,प्रद्युम्न , आणि अनिरुद्ध)

ब)स्व-अंश :- आंशिक विस्तार

• लीला-अवतार:- असंख्य :- समुद्रात जेवढ्या लाटा निर्माण होतात त्यापेक्षा जास्त अवतार उदा. राम, नरसिंह, वराह इत्यादी

• पुरुष-अवतार:- भौतिक जगाच्या निर्मिती करिता:- कारणोदकशायी, गर्भोदकशायी आणि क्षीरोदकशायी विष्णू

• गुण-अवतार:- ब्रह्मा – रज , विष्णू – सत्त्व , शिवा- तम

• मन्वंतर –अवतार :- ब्रह्माच्या एका दिवसात १४ मनू येतात, आणि प्रत्येक मनूच्या काळात भगवंत एक अवतार घेतात.

• युग-अवतार:- सत्य- शुक्ल , त्रेता –रक्त , द्वापार – श्याम , कली- पीत

• शक्ती आवेश -अवतार:- विशिष्ट जीवाला विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रदान केलेली शक्ती

1)अवतार :- जीवाला प्रत्यक्षात शक्ती प्रदान केलेली

कुमार – ज्ञान शक्ती

नारद- भक्ती

अनंत – भू-धारण शक्ती

2)विभूती :- भगवंतांची शक्ती दर्शविणारे जीव