गीता अध्याय १ अर्जुन-विषाद-योग

संपूर्ण भगवत गीता पूर्णपणे भक्तीच आहे पण तरी त्यातील १८ अध्यायाचे तीन विभाग पाडले जातात.

पहिल्या सहा अध्यायात आपण बघणार आहोत, कुठल्या प्रकारची कर्मे केल्याने आपण भक्ती साध्य करू शकतो( कर्म-योग). मधल्या सहा अध्यायात (भक्तियोग) कसा करावा हे सांगितले आहे. आणि शेवटच्या सहा अध्यायात ज्ञानाने भक्ती कशी साध्य करता येते हे सांगितले आहे. भौतिक आसक्ती दूर घालवण्यासाठी तत्त्वज्ञान असणे फार महत्वाचे आहे.तत्त्वज्ञानाचा उपयोग मायेच्या प्रभावातून बाहेर पडण्यास होतो आणि कृष्णाला आसक्त कसे होता येईल यास ही तत्त्वज्ञानाची खूप मदत होते. जेव्हा ज्ञान आपण भक्तीत प्रगती करण्यासाठी उपयोगात आणतो तेव्हा (ज्ञानयोग) भक्तीतला एक घटक होतो.
भक्तीशी संबंध नसणारे कर्म आणि ज्ञान निरुपयोगी ठरते. ह्यासाठीच भक्तीची चर्चा गीतेत मधल्या सहा अध्यायात करण्यात येते जेणेकरून ती कर्म आणि ज्ञान या दोघांच्याही संपर्कात राहील.

प्रस्तावना
श्रील प्रभुपाद यांनी जेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा भगवत गीता छापली तेव्हा प्रिंटींग प्रेसने चारशे पानापेक्षा कमी पाने छापली. नंतर पुन्हा भगवत गीतेची मागणी वाढली तेव्हा प्रभुपादांनी पूर्ण तात्पर्य सर्व फोटो सहित छापली. प्रभुपाद म्हणतात ही गीता का प्रसिद्ध झाली तर मी यात कुठल्याच प्रकारची भेसळ केली नाही आणि जशी आहे तशी ती मांडण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे आमचे कार्य आहे. ह्या मागचा हेतू म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात श्रीकृष्ण या पृथ्वीवर अवतरीत होतात त्याच उद्देशाबद्दल बद्ध जीवांना मार्गदर्शन करता यावे. भगवत गीतेचा उपदेश आपण जसा आहे तसा मान्य करणे आवश्यक आहे नाहीतर श्रीकृष्णांना जाणून घेणे शक्य नाही.कलियुगातील सामान्य लोक श्रीकृष्णांच्या बहिरंग शक्तीने मोहित झालेले आहेत. आणि त्यांना वाटते की भौतिक सुखाच्या साधनांचा विकास केला तर प्रत्येक व्यक्ती सुखी होईल. भगवत गीता सांगते की अशा प्रकारे सुखी व्हायचा कितीही प्रयत्न केला तर तो व्यर्थ ठरेल. आपण कृष्णांचे अंश असल्यामुळे फक्त त्यांची सेवा केल्यानेच आपण परम सिद्धी गाठू शकतो. माझ्या या प्रयत्नाने जर एक जीव जरी कृष्णाचा भक्त झाला तर आम्ही यश गाठल अस समजू.

भगवत गीतेला गीतोपनिषद म्हटले आहे, हे एक महत्वपूर्ण उपनिषद असून सर्व वेदांचे सार आहे. भगतव गीतेचा आशय खुद्द गीतेतच दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण एखादे औषध त्यावर लिहिलेल्या निर्देशनानुसारच घेतो स्वतःच्या लहरीप्रमाणे किंवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशनानुसार नव्हे, त्याचप्रमाणे गीतेत कृष्ण जे सांगतात, तेच आपण सत्य मानावे.भगवत गीता हा ग्रंथ विशेष करून भक्तांसाठीच आहे. अध्यात्मवादी साधकांचे तीन प्रकार असतात. ज्ञानी, योगी आणि भक्त किंवा निर्वेशेश्वादी, ध्यानयोगी आणि भक्त. भक्ताचा भगवन्तांशी पाच प्रकारे संबंध असतो, कोणाचा कुठला संबध आहे हा एक गहन विषय आहे. शांत,दास्य, सख्य,वात्सल्य आणि माधुर्य, भगवंत भक्ताशी या पाच प्रकारच्या रसाचे आदानप्रदान करतात. भक्ताचा जो कृष्णाशी संबंध आहे त्या संबंधाची भक्तिमय सेवेद्वारे पुनर्जागृती होते. यालाच “स्वरूपसिद्धी “ म्हणतात. म्हणजे आपल्या शाश्वत संबंधात पूर्ववत स्थित होणे.

अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा भगवत-गीतेचा उद्देश आहे.ज्याप्रमाणे अर्जुनाला कुरुक्षेत्रात युद्ध करण्यात अडचणी होत्या त्याचप्रमाणे प्रत्येकाला विविध प्रकारच्या अडचणी आहेत. सर्व जण या अडचणींनी त्रस्त आहेत. खऱ्या प्रकारे मानवतेचा आरंभ तेव्हा होतो जेव्हा व्यक्ती आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मी दुःख का भोगतो, मी कुठून आलो आहे, मृत्यू नंतर कुठे जाणार आहे?या प्रश्नांबद्दल जे जीज्ञासू आहेत तेच भगवत-गीतेचे अभ्यासक होण्यास लायक आहेत. “अथातो ब्रह्म जीज्ञासा” जोपर्यंत परब्रह्माची स्थिती जाणण्याची जीज्ञासा होत नाही तोपर्यंत सर्व कार्ये निष्फळच ठरतात. थोडक्यात प्रामाणिक शिष्याला भगवंताविषयी पराकाष्ठेचा आदर असणे खूप आवश्यक आहे.

भगवत गीतेचा विषय म्हणजे पाच मुलभूत तत्वाबद्दलचे ज्ञान होय. ईश्वर, जीव, प्रकृती , काळ आणि कर्म. ईश्वराचे स्वरूप काय, जीवात्म्याची स्वरूप स्थिती , प्रकृती भौतिक विश्व म्हणजे काय व ते काळाच्या प्रभावाने कसे नियन्त्रीत केले जाते.जीवात्म्यांची कर्मे कोणती हे सर्व ज्ञान आपण भागवत गीतेतून मिळवणार आहोत.
ज्याप्रमाणे सोन्याचा कण सोनेच आहे आणि समुद्रातील पाण्याचा थेंब ही खारटच असतो , त्याचप्रमाणे आपण कृष्णाचे अंश असल्याकारणाने त्यांच्यातील सर्व गुण सूक्ष्म रुपात आपल्यात आढळतात. उदा ग्रहांवर नियंत्रण ठेवणे space war हा गुण आपल्यात कुठून आला कारण कृष्ण सर्व ग्रहांवर नियंत्रण ठेवतात त्याचप्रमाणे आपल्यातही तो गुण आहे. सत्त्व, रजो आणि तम या तीन गुणांच्या पलीकडे काळ हे शाश्वत तत्त्व आहे. प्रकृतीचे गुण आणि शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली जीव जी कार्ये करतात त्यांना कर्म असे म्हणतात.ही कर्मे अनादी काळापासून चालत आली आहे. आणि या कर्मानुसार आपण सुख किंवा दुःख भोगत असतो. या पाच तत्त्वांपैकी चार म्हणजे ईश्वर,जीव, प्रकृती, आणि काळ हे शाश्वत आहेत आणि आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेने आपण कर्मामध्ये बदल आणु शकतो, कुठले कर्म केले पाहिजे आणि कुठले नाही हे आपल्याला भगवत गीतेत सांगितले आहे. प्रकृती चेतन नसतानाही कशाप्रकारे शाश्वत आहे? ढग पाऊसपाडतात आणि धान्याचे पोषण करतात आणि वर्षारुतुनंतर ढग नाहीसे होतात.पण परत वर्षारुतुत ढग येतात त्याच प्रमाणे भौतिक प्रकृतीचे कार्य नित्य चालूच राहते. म्हणून प्रकृती शाश्वत आहे.
१)जड प्रकृतीच्या संपर्कामुळे चेतनेची निर्मिती होते ही चुकीची समजूत आहे.
२) चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीत प्रकृतीचे घटक एकत्र आल्यामुळे होतो हा पाश्चात्य शिक्षण संस्थेची समजूत आहे. भगवत गीता हे स्वीकार करत नाही.
ज्याप्रमाणे रंगीत काचेतून बघितल्यावर सर्व काही त्याच रंगाचे दिसते तसेच चेतना जड प्रकृतीच्या परिस्थितीत अधीन होवून विकृत होते. पण ईश्वर भौतिक दृष्ट्या प्रभावित होत नाहीत, कारण प्रकृती भगवंतांच्या अधीन असते. “मयाध्याक्षेण प्रकृतिः”.
मुक्ती म्हणजे भौतिक चेतने पासून स्वतंत्र होणे होय. “मुक्तीर हित्वान्यथा रूपं स्वरूपेण व्यवस्थिती”. भौतिक जगातील अशुद्ध भावनेतून स्वतंत्र होणे आणि शुद्ध भावनेत स्थित होणे यालाच मुक्ती असे म्हणतात.
भौतिक भावना म्हणजे मी निर्माता आहे आणि मी भोक्ता आहे. पण वास्तविक आपण सहयोगी आहोत. उदा. यंत्राचा एखादा भाग हा पूर्ण यंत्राला सहयोग करतो. शरीराचा एखादा अवयव पूर्ण शरीराशी सहयोग करतो.
जीव भगवंताना सहकार्य केल्याने सुखी होतो. उदा. मालक आणि गाडी चालक
निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे सत (नित्यत्व) स्वरूपाचा साक्षात्कार आहे,. परमात्मा म्हणजे त्यांच्या सत आणि चीत ( शाश्वत ज्ञान) या स्वरूपाचा साक्षात्कार आहे आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे सत ,चीत आणि आनंद ( नित्य अस्तित्व ,ज्ञान, आणि आनंद ) या तिन्ही स्वरूपाचा संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये साक्षात्कार होय.

“ नित्यो नित्यानाम चेतानास चेतानानाम एको बहूनां हि विदधाती कामान”
सर्व शाश्वत जिवांपैकी कृष्ण हे परम शाश्वत आहेत जे सर्वांचे पालनपोषण करत आहेत. भौतिक जगाचा विकास होण्याकरिता जड वस्तूला चेतन शक्तीची आवश्यकता असते. लहान मुल बालपणापासून तारुण्यावस्थेत प्रवेश करण्याचे कारण त्यात जीवात्मा उपस्थित असतो. त्याचप्रमाणे संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्रीविष्णुंमुळे होतो. “ परास्य शक्तीर विविधेय सूयते स्वाभाविकी ज्ञान बले क्रिया च ” म्हणजे भगवंतांना स्वतःहून काही करण्याची गरज नसते तर त्यांच्या असंख्य शक्ती त्यांच्यासाठी सदैव कार्यरत असतात. आपल्याला काही करायची इच्छा झाली तर पहिले ते कसे करणार, साधन,भांडवल,मदतीला कोण येणार इत्यादी गोष्टींवर सर्व अवलंबून असत. पण भगवंतानी फक्त इच्छा केली की त्यांच्या असंख्य शक्ती हजर होतात आणि अपोआप कार्य होते.
भगवंताच्या वचनांना अपौरुषेय असे म्हणतात. कारण त्यांच्यात सामान्य व्यक्तींसारखे चार प्रकारचे दोष नाहीत. उदा. चुका करणे , भ्रमात असणे, फसवणूक करणे, अपूर्ण इंद्रिये.
सर्व जीवांचे स्वरूप अथवा वैधानिक स्थिती म्हणजे भगवंतांची सेवा करणे होय.
जीवाला भगवंतांची सेवा केल्यावाचून सुखी होणे शक्यच नाही. कर्मी व्यक्ती सुखाची परिभाषा कशी करतो,” दुःखाचा अभाव “ पण वास्तविक तो आनंद नाही. गीता देवतांच्या उपासनेला पण मान्यता देत नाही.जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि व्याधी या चार अवस्थापासून कुठलाही ग्रह मुक्त नाही.

हे भौतिक जग एकूण सृष्टीच्या एक चतुर्थांश इतकेच आहे “ एकांशेन स्थितो जगत”. यात अब्जावधी सूर्य ,चंद्र आणि तारे आढळतील तरी हा एक फारच छोटा भाग आहे. अधिकांश जीव हे भगवत धामात राहतात.भौतिकवादी लोक जे वर्तमान पत्र, कादंबरी इत्यादी जडवादी साहित्य वाचण्याचा छंद बाळगतात, तोच छंद आपण शास्त्र वाचन करण्यात वापरला पाहिजे.कारण असे न केल्यास अंतिम क्षणी भगवंतांचे स्मरण करणे खूप कठीण आहे. जर मन कृष्णाच्या सेवेमध्ये सलंग्न केले तर सर्व इंद्रिये आपोआपच नियंत्रित होवून भगवत-सेवेत मग्न होतात. तर हे मन कस केंद्रित होवू शकत, फक्त कृष्णाच्या नाम , कथा श्रवण करण्यात, त्यांच्याबद्दल ज्ञान प्राप्त करण्यात त्याला केंद्रित केले तर.

अध्याय पहिला अर्जुनविषादयोग

विभाग १.१-११ युद्धाची तयारी
विभाग १.१२-२० विजयाची चिन्हे
विभाग १.२१-२७ भक्त-वत्सल कृष्ण
विभाग १.२८-४६ अर्जुनाची युद्ध न करण्याची ५ कारणे

१.२८-३० नातेवायीकांबद्दल दया येणे
१.३१-३५ भविष्यात सुख गमावण्याची भीती
१.३६-३८ पापक्रूत्याची भीती
१.३९-४३ कुटुंबाचा नाश होण्याची भीती
२.६ अशा बिकट परिस्थितीत निर्णय न घेता येणे

विभाग १.१-१.११ युद्धाची तयारी
१ भगवत गीतेचा अभ्यास कसा करावा? अत्यंत काळजीपूर्वक आणि वैयक्तिक हेतुनिशी कुठलाच अर्थ न लावता , कृष्ण-भक्ताकडून समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
गीतेत सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे आणि इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ही गीतेत आपण पाहू.
हे पूर्णपणे अस्तीक्यवादी ज्ञान आहे कारण स्वयं भगवंत हे ज्ञान देत आहेत.
कुरुक्षेत्र हे पूर्वीपासून एक तीर्थ-स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. जगन्नाथ रथ यात्रा ही तिथूनच सुरु झाली. तेव्हा सर्व व्रजवासी आणि द्वारकावासी तीर्थ स्नान करायला तिथे आले होते. स्वर्गातील देवतासुद्धा या स्थानास पूजनीय मानतात. आणि स्वतः श्रीकृष्ण या स्थळी उपस्थित असल्याकारणाने या कुरुर्क्षेत्राला धर्मक्षेत्र पण म्हंटले जाते.

ज्याप्रमाणे भाताच्या शेतातून अनावश्यक गवत काढून टाकले जाते तसेच कृष्ण या पृथ्वीवरून धृतराष्ट्र पुत्रांसहित इतर सर्व अधर्मी क्षत्रियांचा नाश करून धार्मिक युधीस्ठीराला सम्राट करतील हा युद्धाचा हेतू होता.

२ धृतराश्त्राला स्वतःच्या मुलांबद्दल पूर्ण ज्ञान होते की त्याच्या प्रमाणे तेही अध्यात्मिक दृष्ट्या अंध आहेत आणि भीतीपायी त्यांनी पांडवांशी तडजोड करू नये अशी त्याला स्वतःला भीती वाटत होती.म्हणून तो भीती लपवून संजयला अप्रत्यक्षरित्या हा प्रश्न विचारतो पण चाक्षाण संजय लगेच आपल्या स्वामींचा संशय दूर करतो आणि सांगतो की दुर्योधन त्याच्या सेनापतीकडे जातो आहे युधीस्ठीराकडे नाही. पुढील काही श्लोकात आपण दुर्योधनाचा राजकारणीपणा किंवा मुसाद्देगीरीपणा बघणार आहोत. १) राजा कधीच सेनापतीकडे जात नाही पण हा विरुद्धापक्षाची बाजू सांगायला सेनापतीकडे जातो आहे.२) नंतर दुर्योधन , प्रतिस्पर्धी दृश्तुद्युम्नला युद्धाच प्रशिक्षण दिल्याबद्दल द्रोणाचार्याची चूक दाखवतो.

३. द्रुपद आणि द्रोणाचार्य पूर्वार्ध कथा
“ लेकी बोले सुने लागे “ दुर्योधन धृस्तद्युम्नला द्रुपद पुत्र म्हणतो. कारण त्याला माहित आहे की द्रोणाला पांडव हे अतिप्रिय होते आणि जोपर्यंत द्रोणाचार्य पांडवांच्या बाजूला एखादा शत्रू बघत नाही तो पर्यंत ते १०० % युद्ध करणार नाहीत. म्हणून पूर्वीचे वैर तो त्यांना आठवण करून देतो.
अर्जुन हा पांडवांमध्ये सर्वात निपुण योद्धा असतांनाही दुर्योधन भीमाचा पहिले उल्लेख करतो कारण त्याला माहित होते की त्याचा मृत्यू जर होणार असेल तर तो फक्त भीमाच्या हातानीच. भीमाने तीन वचने घेतली होती. सर्व कौरवांचा वध करेन, दुह्शासानाची छाती फाडेन आणि हात उखडून काढेल आणि दुर्योधनाची मांडी फोडेन. एवढ सांगितल्या नंतर आपले सैन्य खचून जावू नये म्हणून दुर्योधन स्वतःच्या सैन्याबद्दल बोलायला सुरुवात करतो.
८ भवान भीष्मश्च……कर्णश्च कृपश्च समितिंजयःअश्वत्थामा विकर्णश्च
जसा वैश्य लोकांना पैसा लागतो तसा क्षत्रियांनामान लागतो.वेदिक शिष्टाचाराचे पालन दुर्योधनाने कधीच केले नाही, पण अर्जुन निस्वार्थी असतांनाही म्हणजे गोंधळून गेल्यावर रडतानाही शिष्टाचार सोडत नाही. २.४ कथम भीष्मम अहं संखे द्रोणम च मधुसुदनाम .
९ अन्ये च बहावा शूरः …… यादी थांबविली कारण द्वेष नको. त्यक्त जीविताः चा अर्थ हा पण होतो की त्यांनी आधीच माझ्यासाठी जीव दिला आहे.
१०. पण दुर्योधन निपुण राजकारणी असल्यामुळे लगेचभीष्माला वाईट वाटू नये म्हणून भीष्माला पूर्ण श्रेय देतो. अपर्याप्तं आणि पर्याप्तं …..अनुभव वि जिद्द
युद्धात मन असेल तर अनुभव जास्त कामाचा नाही भीष्म अनुभवी असले तरी त्यांचे युद्धात मन नाही.
११ पण म बाकीचे योद्धे नाराज होतील की भीष्मच सगळ करणार आहेत तर आम्ही जातो. म्हणून “अयनेषु च सर्वेषु “

विभाग १.१२-२० विजयाची चिन्हे
१) कृष्णाचा या युद्धात पांडवांच्या बाजूने समावेश
२) जिथे कृष्ण तिथे लक्ष्मिदेवी असणारच आणि जिथे लक्ष्मिदेवी तिथे विजय आणि समृद्धी असणारच.
३) कुरुक्षेत्र हे तीर्थ स्थान असल्यामुळे पांडवांना सहकार्य करेल.
४) हनुमानजींची अर्जुनाच्या रथावर ध्वजचिन्हाच्या रुपात उपस्थिती.
५) अर्जुनाला अग्निदेवाने दिलेला रथ जो सर्व दिशेत विजय मिळवू शकतो.
६) पांडवांच्या शंखनादाने कौरवांचे ह्रदय हादरणे.

१३-१८ पांडवांच्या दिव्य शंखांची नावे
कृष्ण- पांचजन्य
अर्जुन- देवदत्त
युधिष्ठीर-अनंतविजय
भीम- पौंड्र
नकुल-सुघोष
सहदेव- मणिपुष्पक

हृषीकेश:- श्रीकृष्णाला हृषीकेश म्हणतात कारण ते सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत.
गोविंद:- गो म्हणजे गायी आणि इंद्रिय , कृष्ण गायींना आणि सर्वांच्या इंद्रियांना आनंद प्रदान करतात, म्हणून त्यांचे एक नाव गोविंद आहे.
धनंजय :- जो अमाप संपत्ती गोळा करू शकतो त्याला धनंजय म्हणतात. हे अर्जुनाचे एक नाव आहे.
वृकोदर :- भीमाला वृकोदर म्हंटले आहे, अतिदुष्कर कार्य करणारा, कारण तो हिडींबासारख्या राक्षसाचा वध करू शकतो आणि प्रचंड प्रमाणात अन्न भक्षण करू शकतो.
अच्युत :- श्रीकृष्णाला अच्युत असे म्हणतात कारण त्यांचे कधीच पतन होत नाही. पुरुषोत्तम भगवान असूनही ते अर्जुनाचे सारथी झाले तरी त्यांच्या दिव्य अवस्थेत काहीच फरक पडत नाही. सारथी म्हणूनही ते सर्वांच्या इंद्रियांचे स्वामीच आहेत.
गुडाकेश:- गुडका म्हणजे निद्रा किंवा अज्ञान. गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेवर आणि अज्ञानावर विजय मिळवला आहे. अर्जुन हा कृष्णाचा मित्र असल्याकारणाने त्याने अज्ञानावर विजय प्राप्त केला आहे आणि तो रात्रीही युद्ध करू शकत असल्याने निद्रेवरही त्याने विजय मिळवला आहे.

अर्जुनाची कारणे कृष्णाची उत्तरे
१.२८-३० नातेवायीकांबद्दल दया येणे  २.११-३०
१.३१-३५ भविष्यात सुख गमावण्याची भीती  २.३१-३२
१.३६-३८ पापक्रूत्याची भीती  २.३३-३७
१.३९-४३ कुटुंबाचा नाश होण्याची भीती  २.४५-४६ & ३.२४
२.६ अशा बिकट परिस्थितीत निर्णय न घेता येणे उर्वरित भगवत गीता

१.२८-३० नातेवायीकांबद्दल दया येण्याची कारणे :- १) भगवंतांचा शुद्ध भक्त असल्यामुळे अर्जुनाला सर्व जीवांबद्दल हृदयात दया आणि करुणा होती.
२) जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे किंवा देहात्मबुद्धीमुळे अर्जुन गोंधळून गेला.
भयाच कारण :- भगवंतांच्या विस्मृतीमुळे जीव भयभीत होतो, कृष्णा व्यतीरिक्त काही आहे, जे माझ आहे, आणि ते गमावलं तर काय होईल अशा प्रमाणे जीव भयभीत होतो.
३) कुटुंबाचा नाश:- जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व पवित्र संस्कारासाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात.पण अशा वरीष्ठ व्यक्तींच्या मृत्यू मुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात.यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होवू शकतात. आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात.
जीवनातील शांती , भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती साठी समाजातील सभ्य लोकांची संख्या ही मुलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्त्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिस्ठेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे लहान मुले ही वाम मार्गाला लागू शकतात. त्याच प्रमाणे स्त्रियांचेही अधः पतन होवू शकते. म्हणून लहान मुलांना आणि स्त्रियांना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीन कडून संरक्षणाची आवश्यकता असते.विविध धार्मिक कार्ये करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. अशाप्रकारे पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे चांगली संतती निर्माण होईल. व्यभिचाराला मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढते. बेजबाबदार व्यक्ती याचा फायदा घेतील आणि वर्णसंकर बेसुमार प्रमाणात वाढेल आणि युद्ध ,महामारीचे संकटे उभे राहतील.
पिंडदान क्रिया करण्यास तरुण पिढी तयार नसेल आणि कुटुंबातील पूर्वजांचे पतन होईल.भागवतं श्लोक “देवर्षी भूताप्त नृणाम पित्रीणां” सांगतो की भक्तांसाठी भक्ती पुरेशी आहे. उदा. प्रल्हाद महाराज