विश्वरूप दर्शन योग

अध्याय ११
विश्वरूप दर्शन योग

दहाव्या अध्यायात (१०.४२) भगवंत म्हणतात की एकम्शेना स्थितो जगात माझ्या एका अंशाने मी संपूर्ण जग व्यापले आहे. अर्जुन कृष्णाला रथावर बघतो आहे आणि त्याच बरोबर ते सर्व व्यापी कसे आहे ते त्याला बघायचे आहे म्हणून तो त्यांना विराट रूप दाखविण्याची विनंती करतो.

विभाग १-८ अर्जुनाची विनंती आणि कृष्णाद्वारे विराट रूपाचे स्पष्टीकरण
विभाग ९- ३१ अर्जुन विराट रुपात काय बघतो आहे त्याचे संजयद्वारे स्पष्टीकरण
विभाग ३२-३४ मी काळ आहे, माझे साधन हो
विभाग ३५-४६ अर्जुनाच्या प्रार्थना
विभाग ४७-५५ फक्त शुद्ध भक्त श्रीकृष्णाचे द्विभुज-रूप बघू शकतात.

कृष्ण कथा श्रवणाने सर्व भ्रम नष्ट होतो.
भविष्यात बरेच ढोंगी लोक स्वतःला भगवंत म्हणतील म्हणून अर्जुन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे की अशा व्यक्तीला विराट रूप दाखवावे लागेल. आणि प्रत्यक्षात त्याला विराट रूप बघायचे आहे कारण नंतर भविष्यात लोक नाव नाही ठेवणार.
योगेश्वर:- सर्व योग सिद्धींचे स्वामी
भगवंतांच्या असीम कृपेशिवाय कोणीही त्यांना बघू शकत नाही.

५-८ विराट रूप म्हणजे एकाच ठिकाणी बसून भूत ,वर्तमान आणि भविष्य सर्व काही बघ.

२८-२९ पतंग किडा अग्नीला आकर्षित होतो आणि त्यात नष्ट होतो पण त्याने कोणालाच फायदा होत नाही. अग्नी संतुष्ट होत नाही कारण काहीच मास नाही आणि किडा तर मरण पावतो. पण नद्या जेव्हा समुद्रात मिसळतात तेव्हा नदीकाठील लोक पुरापासून वाचतात आणि समुद्रातही जल वाढते. म्हणून भक्त आणि अभक्त दोघांचे मरण सारखे नाही, कारण समुद्रात प्रवेश केल्यावरही पाण्यावर काही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे भक्त हा मृत्यू नंतरही आपली भक्तिमय सेवा चालू ठेवतो. पण किडा मात्र स्वतःच अस्तित्व नष्ट करतो.

३२ दोन अर्थ आहेत इथे – तू सोडून इतर सर्व मरण पावतील आणि तुझ्या अनुपस्थितीतही हे सर्व मरण पावतील.

३३ तू युद्धात निपुण आहेस पण कुठल्याही कौशल्यात प्राविण्य मिळवायचे असेल तर त्या कौशल्याचा माझ्या सेवेत उपयोग कर.

विराट रूप हे काल्पनिक आहे की खर आहे?
जे जड भौतिक वस्तूंशिवाय काहीच जाणू शकत नाही त्यांच्यासाठी हे रूप आहे. पूर्ण भौतिक जग विराट रूपावर स्थित आहे. आपण जे बघतो आहे ते भगवंतांचे अप्रकट रूप आहे, पण तात्पुरते आहे. महाविष्णूंनी श्वास आत घेतल्यावर सर्व नष्ट होते. वैकुंठात भगवंतांच्या इतर रुपांसारखे कुठेही “विराट रूप” अस्तित्वात नाही.

योग शिडी
विकर्म – निंद्यकर्म
कर्म कांड – कर्म करा
कर्म योग –हेतू आहे कर्म बंधनातून मुक्ती, अनासक्तीने कर्म करणे , त्याग
ज्ञान-योग – मानसिक तर्क वितर्क – ज्ञान + त्याग ( कर्म नाही )
ध्यान –योग — त्याग + ज्ञान + ध्यान + ( कर्म नाही )
भक्ती-योग – त्याग + ज्ञान + ध्यान + कर्म + भक्ती
भक्तांच्या कृपेने आपल्याला कर्म-योगातून सरळ थेट भक्ती योग गाठता येतो. ही भक्तीची किमया आहे.

५५ श्री कृष्ण उत्तम साध्य आणि भक्ती ही श्री कृष्ण प्राप्त करण्यासाठी उत्कृष्ट साधना