भक्तियोग

अध्याय १२

भक्तियोग

अकराव्या अध्यायात भगवंतांचे अगणित सर्वव्यापी ऐश्वर्य ऐकल्यानंतर अर्जुना पुन्हा कृष्णांच्या साकार रुपाबद्दल ,भक्ती बद्दल विचारणा करतो कारण त्याला भक्ताचे स्थान ज्ञानी पेक्षा उत्तम आहे हे स्पष्ट करायचे आहे. नाहीतर काही लोक अवाढव्य विराट रुपाला भगवंतांच्या साक्षात रूपापेक्षा जास्त महत्व देतील.

विभाग १-७ निर्विशेश्वादा पेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे
विभाग ८-१२ भक्तीत प्रगतीचे वेगवेगळे स्थर
विभाग १३-२० भगवंतांना अतिप्रिय असणारे भक्तांचे गुण

विभाग १-७
भक्ती हा आत्मसाक्षात्कारासाठी सोपा आणि सुनिश्चित मार्ग आहे.
१. आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यान मध्ये मुख्यतः दोन प्रकारचे योगीजन असतात. निर्विषेश्वादी जे भगवंतांच्या अप्रकट निराकार ब्राह्मज्योती वर आपले ध्यान करतात आणि भक्त जे आपल्या सर्व शक्ती निशी भगवंतांची सेवा करतात. भगवंतांच सान्निध्य प्राप्त करण्यास भक्ती हाच एक मार्ग आहे. आत्ता पर्यंत भागवत गीतेत आपण बघितल की प्रत्येक अध्यायात अंतिम निष्कर्ष हा भगवंतांच्या रुपाला आसक्त होणे याला दिला आहे.

उदाहरणार्थ
अ) २ अध्याय :- जीव हा परम सत्याचा अंश आहे आणि परम सत्य हे अध्यात्मिक पूर्णत्व आहे.
आ) ६ अध्याय :- भक्ती योगी हा सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे.

इ) ७ अध्याय:- प्रत्येक जीवाने आपल सर्व लक्ष श्रीकृष्णावर केंद्रित केल पाहिजे. दुष्कृतीना, सुकृतिना, देवता उपासक आणि निर्विशेश्वादी ….व्यर्थ आहेत, बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते
वासुदेव सर्वं इति स महात्मा सुदुर्लभः

ई) ८ अध्याय:- जो कोणी मरतेक्षणी श्रीकृष्णाच चिंतन करतो, तो देह सोडल्यानंतर भगवत धामात प्रवेश करतो. यात काहीच संशय नाही.

२. जे भक्तिमय सेवेत संलग्न आहेत ते उत्तम आहेत कारण – ते माझ्या विग्रहावर मन केंद्रित करून दिव्य श्रद्धेने माझी पूजा करतात. शुद्ध भक्त समाधिस्थ होऊन एकही क्षण वाया न घालवता सतत भगवंतांची सेवा करत असतो. श्रवण,कीर्तन, भगवंतांसाठी भोग (स्वयंपाक) तयार करणे , भाजी आणणे , भगवंतांच्या सेवेत लागणारी भांडी घासणे.
अर्जुनाला संशय येतो की पण एवढे श्रम घेणाऱ्या निर्विषेश्वादी व्यक्तीला काय फळ मिळत. कारण तोही सर्व त्याग करून ,अप्रकट ब्रह्मज्योतिवर ध्यानस्थ आहे.

३ व ४ . तेही शेवटी श्रीकृष्णालाच शरण येतात. परम सत्याच्या निराकार अवस्थेची लक्षणे काय आहेत? अप्रकट, इंद्रियांच्या पलीकडे , सर्वव्यापी, अचिंत्य, स्थिर, कधीही न बदलणारे, अचल
अशा परम सत्याची उपासना कशी करावी लागते?
इंद्रिय संयमन करून, सर्व जीवांशी एकभावाने वागणूक ठेवून, सामाजिक कार्यात कार्यरत होवून अशा निर्विशेष ब्रह्मज्योतीची उपासना करवी लागते.

५.पण निर्विषेश्वादी व्यक्तींचा मार्ग हा फार त्रासदायी आणि कठीण असतो.
अनादी काळापासून जीव हा देह्बद्ध झालेला आहे त्यामुळे सिद्धांत रूपाने “ आपण शरीर नाही” हे ज्ञानी व्यक्तीने जाणणे फार कठिण आहे. देहधारी जीवाला भगवंतांच्या सेवेत संलग्न होणे हा मार्ग अत्यंत सहजसुलभ आणि स्वाभाविक आहे.
अर्चविग्रहसेवा ही पुतळ्याची पूजा आहे का?
भगवंत भौतिक तत्त्वान्द्वारेही प्रकट होतात, ही त्यांची परिपूर्णता आहे. त्यामुळे शास्त्रानुसार जेव्हा विग्रहाची स्थापना होते तेव्हा भगवंत स्वतः त्यात प्रवेश करतात.

आठ प्रकारच्या वस्तूने विग्रह निर्माण करता येतात.
याचे एक उदाहरण म्हणजे टपालपेटी.आपण जर त्यात पत्र टाकले तर निश्चितच ते इष्ट स्थळी पोहोचेल. पण टपाल खात्याने अधिकृत न केलेल्या कोणत्याही लाल रंगाच्या टपालपेटीत आपण पत्र टाकल तर ते आजन्म तिथेच पडून राहील. त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रहरुपामध्ये अधिकृतरीत्या प्रकट होतात त्या विग्रहाला अर्चाविग्रह म्हणतात. सर्व शक्तिमान भगवंत या विग्रहाद्वारे भक्ताशी सेवारूपी आदान प्रदान करतात. बद्ध जीवाला ही संधी एक वरदान आहे.
निर्विषेश्वादी व्यक्तीला उपनिषदान्द्वारे परम सत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा खोल अभ्यास करून जाणावे लागते. त्यासाठी संस्कृत भाषा शिकावी लागते. कठोर इंद्रिय संयमन करावे लागते. हे सर्व साधरण मनुष्यासाठी सोपे नाही.

६ व ७ :- भक्ती सहज सोपी का आहे कारण भगवंत स्वतः भक्ताला या भवसागरातून मुक्त करण्यास त्वरित मदत करतात.
योगींना कठोर परिश्रम करून दुसऱ्या लोकांमध्ये प्रवेश मिळतो.पण इथे भगवंत वचन देतात की भक्ताला मात्र मी स्वतः त्वरित माझ्या धामात नेतो.
उदा. वराह पुराण:- वैकुंठात जाण्यासाठी भक्ताला अष्टांग योग करण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे लहान बालकाची पूर्ण काळजी मातापिता घेतात त्याचप्रमाणे भगवंत स्वतः गरुडावर आरूढ होवून येतात आणि भवसागरातून भक्ताची सुटका करतात.समुद्रात पडलेला व्यक्ती कितीही चांगला पोहणारा असला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही.त्यालाही कोणी मुक्त मनुष्यच बाहेर काढू शकतो.बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत भक्तीला प्राधान्य दिले पाहिजे. भक्ताला तर्कवाद ,कर्मकांड, दान, ज्ञान, इत्यादीपासून प्राप्त होणारे लाभ आपोआपच प्राप्त होतात.जीवनाची परम सिद्धी म्हणजे हरे कृष्ण महामंत्र जप करून भागवत धामात प्रवेश करणे.

विभाग ८-१२

भक्तीचे स्थर

१२.८ मन कृष्णभक्तीमध्ये रममाण ( उत्तम भक्ती अवस्था )
१२.९ साधना भक्ती द्वारे मन भक्ती मध्ये रममाण करण्याचा प्रयत्न ( इच्छा जागृत करणे )
१२.१० कृष्णासाठी सर्व कर्म करणे ( निष्काम कर्म )
१२.११ त्याग , ध्यानयोग आणि ज्ञान प्राप्त करणे ( मन शुद्ध करणे , शांती प्राप्त करणे आणि हळुवार शुद्धीकरण करणे )
भक्ती-योग म्हणजे भौतिक जगाशी अनासक्त होवून श्रीकृष्णाला आसक्त होणे.
तर हा भक्ती-योग कसा करावा? कृष्ण सर्वात उत्तम श्रेणीच्या भक्तापासून सुरुवात करतात की त्याला त्याच्या पातळीनुसार भक्तीत काय प्राप्त होते.

८. फक्त कृष्णावर मन केंद्रित केल्याने आणि बुद्धी कृष्णाच्या ठायी युक्त केल्याने निश्चितच भक्त सदैव श्रीकृष्णामध्ये वास करतो. या स्थरावर भक्त आधीच कृष्णाशी आसक्त झालेला असतो. उत्तम भक्ती

९. जर तू एकाग्रतेने माझ्यावर मन स्थिर करू शकत नाही तर भक्तियोगाच्या नियामक तत्त्वांचे पालन कर. म्हणजे :- साधना भक्ती, गुरूंच्या आदेशने आपण साधना करतो त्यात आपला रस उत्पन्न झाला नाही. उदा. मंदिरातील सेवा. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. जो कृष्णाशी आसक्त नसेल तर नियामक तत्त्व पालन केल्याने – कृष्ण प्राप्तीची इच्छा उत्पन्न करतो.
भक्ती योगाची व्याख्या :- नियमित तत्व पालन करून इंद्रिये शुद्ध करणे त्यासाठी इंद्रियांना प्रत्यक्षात भगवंतानाच्या सेवेत संलग्न करायला हवे.

१० जर तू नियामक तत्व पालन पण करून शकत नाही तर तुझे सर्व इंद्रिय माझी साठी कार्यरत कर. निष्काम कर्म योग :- अनासक्त कर्म – कृष्णासाठी कर्म करणे आणि कर्म फळ कृष्णाला अर्पण करणे , त्याने काय होईल तुला भगवत-प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येईल.
तर कृष्णासाठी कर्म कसे करता येईल?
भगवंतांच्या प्रचारकार्याला सहाय्य करू शकतो. प्रचार कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना निर्माण आणि परिश्रम सर्वांची आवश्यकता असते. यात जे काही आपल्याच्याने उत्तम होईल ते करायला हवे. जर तुम्ही पूर्ण कर्म फळ अर्पण करू शकत नसला तर त्याचा काही भाग अर्पण करा.
मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर तो कृष्णभावनेच्या प्रचारार्थ आपल्या कर्मफलांचा काही भाग अर्पण करू शकतो.

११ जर तू कृष्णासाठी कर्म करू शकत नसशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि अशाप्रकारे आत्मस्थित होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कष्टार्जित धनासंचयाचा काही चांगल्याकार्याकरिता त्याग करू शकता. उदा. जर कृष्ण भावना संघासाठी घरातून विरोध होत असेल तर रुग्णालय उभारणे, सामाजिक कार्यांना मदत करायला हवी, याने मन शुद्ध होऊन ज्ञान प्राप्त करण्यास व्यक्ती पात्र होतो.

१२ किंवा जर तू निष्काम कर्म करू शकत नसाल तर ब्रह्म ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. शरीर आणि आत्मा यांचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. त्याच्यापेक्षा उत्तम म्हणजे परमात्म्यावर ध्यान करण्याचे ज्ञान.ध्यानयोगापेक्षा उत्तम कर्मफलाचा त्याग करणे होय कारण अशा त्यागाने मनःशांती प्राप्त होते. शांतीच सूत्र भोक्तारं यज्ञ तापसां

विभाग १३-२०
भक्तीमध्ये संलग्न झाल्यावर भक्तामध्ये दिव्या गुण प्रकट होतात. आणि त्या गुणांनी भगवंत प्रसन्न होतात.

१३-१४ जे दुःख आपल्या जीवनात आहे ते कृष्णकृपेने कमी होऊन फक्त टोकन म्हणून समजणे.
सहनशील :- कुठल्याही परिस्थितीत तो विचलित होत नाही.
निर्वैर:- तो शत्रूशीही वैर करत नाही. माझ्या जीवनातील सर्व वाईट हे माझ्या पूर्व कर्मामुळे होत आहे आणि भगवंत त्याची प्रतिक्रिया कमी करतात आहे खरतर मला माझ्या कर्मानुसार याच्या पेक्षा जास्त वाईट परिणाम मिळायला पाहिजे पण भक्तीने भगवंत माझ्यावर कृपा करतात आहेत.
निर्मम:- मी शरीर नसून आत्मा आहे त्यामुळे सुखाकिंवा दुःख यात तो समतोल राखतो.
संतुष्ट :- भगवत कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच तो संतुष्ट असतो.
परिपूर्ण योगी:- कारण अध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो. त्यांची इंद्रिय संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो.
आपले मन आणि बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर स्थिर करू शकतो.

१५ कधीच दुसर्यांना त्रास होईल असे करत नाही.
तो कोणत्याही बाह्य उपद्रवाने क्षुब्ध होत नाही.

१६ धनप्राप्ती झाली म्हणून तो हरळून जात नाही. अंतर्बाह्य पवित्र असतो, नेहमी दक्ष असतो. वैदिक शास्त्रांवर त्यांचा दृढ विश्वास असतो. कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नसल्याने चिंतामुक्त असतो. तो सर्व उपाधीतून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही.

१७ ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे तो भगवंतांना खूप प्रिय असतो.

१८-१९ -२० मित्र आणि शत्रू दोघांशीही सम वागणे , द्वंद्वात समतोल राखणे , वाईट संगापासून दूर राहणे , मौन राखणे म्हणजे आवश्यक तेवढेच बोलणे , काय आवश्यक आहे :- कृष्ण कथा., संतुष्ट असणे, अनिकेत, निश्चयात आणि ज्ञानात दृढ असणे, भक्तीत सलग्न असणे.