क्षेत्र-क्षेत्रज्ञ योग

अध्याय १३

क्षेत्र-क्षेत्रज्ञ योग

• ज्याप्रमाणे शेतात जे धान्य पेरले आहे तेच पिक आपल्याला मिळते त्याच प्रमाणे पूर्व जन्मी आपण केलेल्या कर्मामुळे आपल्याला शरीररूपी शेत (क्षेत्र)प्राप्त होते जेथे आपल्याला फळ किंवा धान्यरुपी, सुख किंवा दुःख भोगावे लागते. क्षेत्र हा प्रकृतीचा असा भाग आहे ज्यावर जीवाचे प्रभुत्व असते.

• जीव हा फक्त त्याच्या शरीराचा आणि तेही अपूर्ण जाणकार असतो तर परमात्मा हा सर्वांच्या शरीराचे पूर्ण जाणकार असतात.कारण शरीरातील काही गोष्टी कशा प्रकारे कार्यरत आहेत हेही आपण समजू शकत नाही.उदाहरणार्थ शेतकरी फक्त त्याच्या शेताचा जाणकार असतो तर राजा हा सर्वांच्या शेताचा जाणकार असतो.

• कृष्ण ज्ञानाची व्याख्या अशा प्रकारे करतात ..ज्ञान म्हणजे शरीर, आत्मा आणि परमात्मा यांना जाणणे.

• पाचव्या अध्यायात आपण बघितले जीव जेव्हा जाणतो की मी शरीर नसून आत्मा आहे तेव्हा हा जरी सत्व गुणातील साक्षात्कार असला तरी तो मुक्ती साठी पुरेसा ठरत नाही. जेव्हा त्याचे ज्ञान परमात्म्या पर्यंत पोहोचते तेव्हा तो साक्षात्काराचा ब्रह्मभूत स्थर गाठतो.

• शरीर ज्याला भौतिक वस्तूंशी संपर्क साधण्यासाठी इंद्रिये आहेत , हे एका अशा जमीनिप्रमाणे आहे जिथे आपल्या भौतिक अस्तित्वाचे झाड उभे राहणार आहे. जो जीव हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. बद्धावस्थेत तो स्वतःला या शरीराशी आसक्त बघतो आणि मुक्तावस्थेत स्वतःला शरीर न समजून तो शरीर एका वाहणा प्रमाणे बघतो.

• शेतकरी ज्याप्रमाणे चांगले आणि वाईट पिक प्राप्त करतो त्याच प्रमाणे क्षेत्र ज्ञ जो भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो त्याला दुःख आणि यातना ही फळे भोगावी लागतात आणि जे सत्त्व गुणात सर्व उपलब्ध वस्तूंचा उपयोग भगवंतांच्या आणि इतरांच्या सेवेसाठी करतात ते सुख हे फळ प्राप्त करतात.अन्नमय आणि प्राणमय ( स्थूल शरीर), प्राणमय आणि ज्ञानमय ( सूक्ष्म शरीर) आणि विज्ञानमय ( आध्यात्मिक) ( तिसरा श्लोक)

• तैत्तिरीय उपनिषद मुक्तीच्या दोन अप्रत्यक्ष मार्गांबद्दल मार्गदर्शन करते. व्यस्ती म्हणजे व्यक्ती स्वतःवरच ध्यान करतो आणि स्वतःला परम सत्य भगवंतांचा अंश समजून परम सत्याला जाणण्याचा प्रयत्न करतो.

• दुसरी पद्धत समस्ती म्हणजे जो व्यक्ती संपूर्ण विश्वाला भगवंतांचे शरीर समजून त्याचे संशोधन करतो.

• त्यातील व्यस्ती या पद्धतीत साधक जीवाला भगवंतांच्या शक्तीने निर्माण केलेल्या पाच आवरणाने आच्छादलेला बघतो.

• अन्नमय स्थर म्हणजे अन्नावर सर्व काही अस्तित्वात आहे यावर भर देणे.अस्तित्वच खाण्यासाठी

• प्राणमय स्थर म्हणजे प्राण शक्ती गाठणे , अन्ना व्यतिरिक्तही माझ्या इतर आवश्यक गरजा आहे. माझे नातेवायिक आहेत त्यांची सेवा करणे, सर्व वाटून खाणे इत्यादी. जगण्यासाठी सगळ्यांसोबत एकत्र राहावे त्यातच आपल भल आहे. भौतिक वादी समाज पूर्णतः या दृष्टिकोनावर जगतो. हीपण भगवंतांची शक्ती आहे. जियो और जिने दो

• ज्ञानमय म्हणजे अधिक प्रगत स्थर जिथे जीव चिंतन , संवेदन आणि संकल्पा पर्यंत उन्नत होतो.कला, संगीत, साहित्य, नाट्य यात आनंद प्राप्त करणे.

• अन्नमय , प्राणमय आणि ज्ञानमय हे तीन स्थर म्हणजे जीव भ्रमाच्या जाळ्यात अडकलेला आहे हे सिद्ध होते जेथे जीव हा स्वतःला शरीराशी एकरूप मानतो.

• विज्ञानमय म्हणजे जेथे जीव स्वतःला आत्मा, जो स्थूल आणि सूक्ष्म शरीराशी भिन्न असलेला जाणतो. ही अध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात आहे.आत्म्याबद्दल विचार करतो.

• भगवंतांचा उल्लेख आनंदमयो अभ्यासात असा केला जातो. या दिव्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी भगवंत स्वताचा विज्ञानमय , ज्ञानमय , प्राणमय आणि अन्नमय यांमध्ये विस्तार करतात. आध्यात्मिक स्थर प्राप्त करणे.( पाचवा श्लोक)

• ६ श्लोक ….क्षेत्र म्हणजे पंच महाभूत, मिथ्या अहंकार , बुद्धी, अव्यक्त, दहा इंद्रिये, मन आणि पाच इंद्रिय विषय.

• ७ श्लोक …त्यापासून उत्पन्न झालेले क्षेत्र विकार इच्छा ,द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना, आणि धैर्य. या विकारांपासून मुक्ती कशी मिळेल श्लोक २० , जेव्हा आपण हे तत्त्वतः जाणू की भौतिक प्रकृती आणि जीव हे अनादी आहेत.
• बद्ध जीवाच्या शरीराची तुलना आपल्या अंगणातील पटांगणाशी करता येते.लहान मूळ ज्याप्रमाणे या पटांगणा पलीकडे जावू शकत नाही त्याचप्रमाणे जीव हा स्वतःच्या शरीर, मन आणि कर्मापलीकडे म्हणजेच त्याच्या शरीरापलीकडे काहीच अनुभवू शकत नाही.
• उदा गांडूळ हा प्राणी पाऊस आला की जमिनी बाहेर येणे आणि पाऊस संपला की जमिनीत जाणे या व्यतिरिक्त काहीच अनुभवू शकत नाही. त्याच्या तुलनेत कुत्रा हा मोठ्या परिसरात फिरू शकतो आणि धावू शकतो भुंकू शकतो. आणि मनुष्य हा सर्वात प्रगत जीव याचे क्षेत्र जास्त मोठे असते. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाच्या कर्मानुसार सर्वांना क्षेत्र मिळते.
• श्रीमंत व्यक्तीचे पटांगण त्याच्या दृष्टीने खूप मोठे आणि भरपूर सुविधांनी सुशोभित असले तरी ते मर्यादितच असते. कारण तो त्याच्या कुंपणा पलीकडे काहीच बघू शकत नाही.
• म्हणून जीवाला स्वतःच्या इच्छेनुसार आणि कर्मानुसार माया भगवंतांच्या अध्यक्षतेखाली आणि परवानगी नुसार योग्य ते शरीर प्रदान करते. ( ६ आणि ७ )
• भौतिक वस्तूंचा अभ्यास म्हणजे कैद्याने तुरुंगाचा अभ्यास करणे, वैज्ञानिकांचा अभ्यास :- सगळी चौकशी करणे फक्त या तुरुंगाची किल्ली कुठे असते हा प्रश्न कधी न विचारणे. उदा. MrBenford आणि प्रभुपाद , गवताची वाढ कशी होते या विषयावर २ पुस्तके लिहिलीत, पण तुमच्या पुस्तक आधीही गावात वाढतच होत. जर अभ्यास करायचा नाही तर भगवंतांनी गवत कशाला निर्माण केले. प्रभुपाद:- तुम्ही त्या मुख्य व्यक्तीला म्हणजे गवत निर्माण करणाऱ्याबद्दल अभ्यास करण्यास विसरता आहात. खरे ज्ञान जन्म, मृत्यू , जरा आणि व्याधी येथून सुरु होते. वैज्ञानिक फक्त भौतिक वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करून अज्ञान वाढवतात आहेत. अज्ञानाला ज्ञान समजणे म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा.

• १४-१८ श्लोक परमात्म्याला उद्देशून आहेत.

• १६ श्लोक तद दुरे तद अन्तिके ….१) भक्तांसाठी जवळ आणि मायावाद्यांसाठी दूर २) भगवान म्हणून दूर आणि परमात्मा म्हणून जवळ ३) भगवान म्हणून दूर आणि विग्रह म्हणून जवळ.

• १७ घटक ज्ञानी आणि भक्त दोघांनाही लागू पडतात. “ तत्त्व ज्ञानार्थ दर्शनम “आणि अध्यात्म ज्ञान नित्यत्वतम” हे दोन फक्त ज्ञानी व्यक्तीलाच लागू पडतात. अनन्य भक्ती हा गुण फक्त भक्तांना लागू पडतो. हा गुण आल्यावर बाकी सर्व गुण भक्तात आपोआपच निर्माण होतात.

• २१ श्लोक आत्मा हा भोक्तृत्वे ( म्हणजे भोगवृत्तीमुळे) सर्व प्रकारच्या भौतिक भावना अनुभव करतो. उदा. दुपारची टीव्ही वरची सीरिअल, देशप्रेमावरचा सिनेमा , विमान चालविण्याचे प्रशिक्षण देतांना. व्यक्ती जेवढा त्यात गुंतला असेल त्याप्रमाणात तो भौतिक भावना अनुभवेल. जेव्हा भाक्तृत्वे नसेल तर सुख आणि दुःख पण राहणार नाहीत.

• २२ श्लोक त्रिगुणांच्या संपर्कात येवून व्यक्ती भोग करण्यास सुरुवात करतो आणि विविध योनी प्राप्त करतो. १५ अध्याय सुरुवात (त्रिगुण)

• २३ श्लोक परमात्मा हा उपदृष्टा आणि अनुमंता आहे. दिव्य भोक्ता आणि महेश्वर आहे

• २४ श्लोक भौतिक प्रकृती , जीव आणि त्रिगुणांचे विकार यासंबंधीचे तत्त्व जाणतो, तो निश्चितच मोक्ष प्राप्तीसाठी पात्र होतो. हे तत्त्वतः कसे जाणावे

• २५ श्लोक कर्मयोग -> किंवा ज्ञानयोग -> अष्टांग योग करून

• २६ श्लोक भक्तांसाठी फक्त प्रमाणित व्यक्तींकडून श्रवण करण्याच्या प्रवृतीमुळे जन्म- मृत्यूचा मार्ग पार पाडतात जरी त्यांना इतर भौतिक नसले तरी.

• ३२ श्लोक “ न करोति …..३३ आणि न लिप्यते …..३४ “

• ३३ आकाश सर्वव्यापी असूनही कुठल्याच वस्तूत मिसळत नाही. उदा. चिखल, विष्ठा यात वायू गेल्याने तो मिश्रित होत नाही.त्याचप्रमाणे ब्रह्मभूत व्यक्ती शरीरात वास्तव्य करूनही शरीरापासून स्वतःला अलिप्त ठेवतो. ज्याप्रमाणे सूर्य हा संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरातील जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो.