पुरुषोत्तम योग

अध्याय १५

पुरुषोत्तम योग

विभाग १-६ अनासक्तीने मुक्ती मिळविणे ( अश्वत्थ वृक्ष)
विभाग ७-११ तसे न केल्यास सतत देहांतरप्राप्ती करावी लागेल
विभाग १२-१५ इंद्रिय तृप्तीत मग्न असतांनाही कृष्ण कशा आपल्या सर्व गरजा पुरवितात आहे हे कसे जाणावे?
विभाग १६-१८ त्रीश्लोकी गीता ( संबंध ज्ञान)
विभाग १९-२० कृष्णाला जाणले म्हणजे सर्व काही आपोआप जाणले जाईल.

चौदाव्या अध्यायात भगवंत म्हणतात अव्यभिचारिणी भक्ती उत्तम आहे, ती खूप कठीण आहे. कशा प्रकारे तो स्थर गाठावा? म्हणून भगवंत पुरुषोत्तम योग या अध्यायात सांगतात की हे जग खऱ्या जगाचे फक्त एक प्रतिबिंब आहे आणि कृष्ण हे एकच खरे सत्य आहे. हे जाणल्याने अव्यभिचारिणी भक्ती करण्यास प्रेरणा मिळेल.

भौतिक जगाचा उल्लेख एका अश्वत्थ वृक्षाशी करण्यात आला आहे. हा वृक्ष म्हणजे आध्यात्मिक जगाचे एक प्रतिबिंब आहे. भौतिक जगात वृक्ष पाण्यात प्रतिबिंबित होतांना आपण बघतो त्याचप्रमाणे भौतिक जग इच्छेवर प्रतिबिंबित होते. या इच्छेपायी सर्व गोष्टी या भौतिक जगात प्रकाशित झालेली आपल्याला आढळतात.

सकाम कर्मी व्यक्तीसाठी या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. विविध फळांच्या अपेक्षेपायी तो फक्त एका शाखेवरून दुसर्या शाखेवर भटकण्यात गुंग असतो. या वृक्षाशी आसक्त व्यक्तीचा मोक्ष कधीच शक्य नाही.

प्रतिबिंब असल्याकारणाने या वृक्षाची मुळे वर आणि शाखा खाली असतात. या शाखा सर्व दिशेने पसरलेल्या आढळतात. शाखांच्या अग्रस्थानी नाक, कान इत्यादी इंद्रिये आढळतात आणि डहाळ्या म्हणजे शब्द, रूप, गंध, स्पर्श इत्यादी विविध इंद्रियविषये आहेत. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रीयभोगांची उपफळे आहेत. पाप आणि पुण्यवृत्तीचा या दुय्यम मुळांपासून विकास झाल्याचे मानले जाते. आणि ही मुळे सर्व दिशेने पसरलेली आहेत. ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्याने होते त्याचप्रमाणे या वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते. पाणी पुरवठ्यानुसार काही जमिनी ओसाड तर काही हिरव्यागार दिसतात त्याचप्रमाणे जिथे एखाद्या गुणाचा प्रभाव जास्त आढळत असेल तिथे त्या प्रमाणात विविध योनी अभिव्यक्त होतात.या वृक्षाची फळे म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही आहेत.

भक्तीचे मुलभूत तत्त्व म्हणजे भौतिक जगाशी अनासक्ती आणि कृष्ण सेवेप्रती आसक्ती होय. या अध्यायात भौतिक जगाशी असणारी आसक्ती भेदण्याची विधी सांगण्यात आली आहे. मोक्षासाठी या वृक्षाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे तेव्हाच या वृक्षाशी संबंध तोडू शकतो. अशा व्यक्तीला खरा वेदवेत्ता म्हंटले जावू शकते. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभवता येत नाही याचा आदि,अंत आणि आधार कोणीही जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने निश्चयाने (असंग शस्त्रेण )अनासक्तीरूपी कुह्राडीने कापून टाकले पाहिजे.

४.४२ तस्माद अज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मानः छीत्वेनमसंशयं योगं अतिष्ट उतिष्ट भारतः…. ज्ञानरूपी तलवार …. आसीन म्हणजे तलवार

१५.३ असंग शस्त्रेण …………………..अनासाक्तीची तलवार

१.२.१५ भागवतं याद अनुध्यासिना युक्त कर्मग्रन्थी निबंधनम छिन्दंती कोविदास तस्य को न कुर्यात कथा रतीम ……. ……भगवतांचं स्मरण तलवार

पण मुक्तीनंतर मायावाद्यान्सारखे न वागता परम पुरुष श्री कृष्णाला शरण जाणे आवश्यक आहे. अशा त्यांच्या धामात प्रवेश मिळाल्यावर पुन्हा परतायची गरज नाही.

६ भगवंतांना शरणजाण्यासाठी काय पात्रता लागते?
निर्मानमोहा:- खोटी प्रतिष्ठा न बाळगणे आणि मोहापासून मुक्त असणे
जीतसंग दोषा :- असत संगापासून मुक्त असणे
विनिवृत्ता कामा :- वासनेपासून मुक्त असणे
द्वंद्वेर्वीमुक्ता :- सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त असणे.

७ जीव हा भगवंतांचा सनातन अंश आहे पण बद्धावास्थेमुळे तो मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहे.
उदा. तुरुंगात कैद्याचा वेश आणि बिल्ला नंबर
विष्णू तत्त्व स्वांश , नरसिंह , राम इत्यादी आणि जीव तत्त्व विभिन्नांश असल्यामुळे भगवंतांचे गुण त्यांच्यात अंश रुपात असतात. उदा. स्वातंत्र्य , व्ययक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य ज्याचा सदुपयोग आणि दुरुपयोग ठरवतो आपण बद्ध राहू की मुक्त. बद्धावस्था म्हणजे त्रिगुणांचे वर्चस्व म्हणून भगवंतांच्या दिव्य सेवेचे विस्मरण झाले असते. त्यामुळे त्याला त्याचे अस्तित्व राखण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम करावे लागतात. मिथ्याअहंकार आपणास बद्ध करतो. मुक्ती नंतर जीवाला त्याचे आध्यात्मिक शरीर प्राप्त होते. तेव्हा त्याला त्याची स्मृती परत मिळते.
ममेवाम्शो म्हणजे भौतिक वस्तूंचे तुकडे पडल्याप्रमाणे नव्हे कारण आत्म्याचे कधीच तुकडे पडता येत नाही, तो भौतिक दृष्ट्या कधीच जाणला जावू शकत नाही. सनातन अंश .
उदा. सोन्याचे कण आणि सोने गुण एकच .

८ जीव याला ईश्वर असे म्हंटले आहे कारण तो त्याच्या इच्छेनुसार उच्चतर किवा कनिष्ठ योनी प्राप्त करू शकतो. मृत्यू समयीची भावना तुमच्या हातात असते. उदा जनावरासारखे वागणे- जनावर शरीर , दैवी गुण – स्वर्ग प्राप्ती , आणि आध्यात्मिक गुण – वैकुंठ धाम .उदा. वायू आपल्याबरोबर गंध घेवून जातो – विविध संकल्पना – पुढील स्थूल शरीर निर्माण करण्यास कारणीभूत. कर्षति म्हणजे एक देह सोडणे आणि दुसरा देह प्राप्त करण्याचा संघर्ष.

९ तेव्हा त्याला मनाशी केंद्रित विशिष्ट प्रकारची पाच इंद्रिये प्राप्त होतात जेणेकरून तो त्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. उदा साप – गिळणे , मगर- गिळणे, सिंह- कच्च मास आणि रक्त , डुक्कर – विष्ठा.
उदा. चेतना ही पाण्याप्रमाणे शुद्ध आहे पण त्यात जो रंग टाकला तो रंग त्या पाण्याला प्राप्त होईल. “कारणम गुण संगोस्य” गुणांच्या प्रभावाखाली चेतनेतही बदल होतो.

१० जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो? तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या देहाचा उपभोग घेणार आहे हे कोण जाणू शकतो? ज्याच्या कडे ज्ञान चक्षु आहेत तो हे जाणू शकतो. रजो आणि तमो गुणामध्ये स्थित मूर्ख व्यक्ती हे जाणू शकत नाही कारण तो सदैव इंद्रिय तृप्तीसाठी झगडत असतो. गुरूंकडून शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक.

११ योगिनः म्हणजे शारीरिक कसरती करणारे नसून आत्मसाक्षात्काराच्या पथावर असणारे. आत्मा , प्रकृती आणि भगवंत यांचा साक्षात्कार करणारे हे जाणू शकतात इतर मात्र प्रयत्न करूनही हे जाणू शकत नाही. त्यांनी हे जाणले पाहिजे की इंद्रिय तृप्तीही भगवंतांच्या सहयोगाशिवाय शक्य नाही.

१२ जीवनावश्यक अग्नीचे स्त्रोत भगवंतच आहे जे सूर्य,चंद्र आणि अग्निलाही तेज प्रदान करतात. सूर्याशिवाय कशाचाच विकास होवू शकत नाही. युरोपात सूर्यच उगवत नाही. म्हणून लोकांना मानसिक ताण जाणवतो.

१३ भगवंत प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतात आणि त्यांना त्यांच्या विशिष्ट कक्षेत स्थित ठेवतात. शरीरात आत्मा असतांनाच शरीर पाण्यावर तरंगते त्याच प्रमाणे भगवंतांचा समावेश प्रस्तुती सर्व ग्रहलोकांना अंतरिक्षात तरंगत ठेवते. मनुष्याने हाताच्या मुठीत धुळ धरल्याप्रमाणे भगवंतांनी सर्व ग्रहांना धरले आहे. भगवंत चंद्राद्वारे सर्व वनस्पतींना जीवन सत्त्व प्रदान करतात.त्यामुळे खाद्य पदार्थ चविष्ट होतात.

१४ खाल्लेले अन्न पचविण्यासाठीही आपल्याला भगवंतांची गरज लागते. वैश्वानर म्हणजे जठराग्नीही भगवंतच आहेत. ते स्वतः प्राण आणि अपान वायूशी संयोग साधून अन्न पचन करण्यास आपल्याला मदत करतात.

१५ स्मृती, ज्ञान आणि विस्मृती हे सर्व काही भगवंतांच्या कृपेमुळेच शक्य आहे. त्यांनीच वेदांचे संकलन केले आहे जेणे करून आपण त्यांना जाणून त्यांच्या धामात प्रवेश करू शकतो.म्हणजे भगवंत फक्त सर्व्यापीच नसून आपल्या अंतरातही आहेत.

१६ ( संबंध ज्ञान )क्षर आणि अक्षर हे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जग- क्षर आणि आध्यात्मिक जगात अक्षर. भौतिक शरीर बदलते पण आध्यात्मिक शरीर बदलत नाही.

१७ या दोघांव्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहे. जे अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रीकोलांमध्ये प्रवेश करून या दोघांचे पालन पोषण करत आहेत. “ नित्यो नित्यानाम चेतानास चेतानानाम एको बहुनाम यो विधधाती कामान “ सर्व बद्ध आणि मुक्त जीवांमध्ये एकच चेतन पुरुष आहे जो इतर सर्व जीवांना इच्छा पूर्तीसाठी सुविधा उपलब्ध करतो आणि तोच सर्वांचे पालन पोषण करतो.

१८ कृष्ण हे च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत , दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे ते सर्व जगांमध्ये आणि वेदांमध्येही पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत.

१९ अभिदेय ज्ञान जो कृष्णाला संशयरहित होवून पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. फलरूप तो माझ्याभक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो.

२० प्रयोजन :- जो कोणी हे शास्त्राचे गूढ जाणतो तो बुद्धिमान होतो आणि त्याचे सर्व प्रयत्न सिद्धीस प्राप्त होतात.
संबंध – कृष्णाशी आपला संबंध काय आहे तो प्रस्थापित करणे.
अभिदेय :- तो संबंध प्रस्थापित करण्याची पद्धत.
प्रयोजन :- कृष्ण प्रेम हे ध्येय प्राप्त करणे.