दैवासुरसंपद विभाग योग

अध्याय १६

दैवासुरसंपद विभाग योग

पंधराव्या अध्यायाच्या वटवृक्षाची ही दोन फळे आहेत दैव आणि आसुर
दैवी गुण म्हणजे ४ वर्ण आणि ४ आश्रमाचे पालन करणे, यासाठी भौतिक जगाशी संपूर्ण अनासक्त असण्याची गरज नाही.

श्लोक ४ विस्तरशः ……..दंभ:- धार्मिक नसतांनाही धार्मिक पणा दाखविणे

दर्प:- असा अहंकार लोकांसमोर मिरविणे
अभिमान :- मिरविणे आणि दुसर्यांकडून आदराची मागणी करणे
क्रोध:- हा त्यांचा सामान्य व्यवहार
पारुष्य:- बोलण्यात नेहमी कठोरता असणे.

श्लोक ६ :- दैवी गुण:- २.५५ – ७२ :- आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे गुण

१२.१३-२० :- भक्ताचे गुण………………..१३.८-१२ :- ज्ञान उपार्जन करणार्याचे गुण

१४.२२-२६ :- त्रिगुणातीत व्यक्तीचे गुण ( भक्ताचे गुणही असू शकतात)

श्लोक ७ :- वृत्ती :- tendency , प्रवृत्ती :- योग्य कार्य करणे , निवृत्ती :- अयोग्य कार्य.

कलियुगातील धार्मिकता म्हणजे इंद्रीयतृप्तीची भेळ बनविणे आणि त्यावर धार्मिकतेची शेव सजविणे.

प्रत्येकासाठी यशाची व्याख्या एकाच ठेवली तर समाजात अशांतता होणारच. ब्राह्मण, क्षत्रिय ,वैश्य आणि शुद्र किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या यशाची व्याख्या एकाच असावी असे सध्याच्या पिढीचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यांना वाईट सवयी लागतात आहेत.

आसू:- प्राण वायू आणि र:- रमन्ते , जे फक्त इंद्रिय तृप्तीतच रममाण असतात त्यांना असुर म्हंटले जाते.

श्लोक ८ असत्यं:- मायावादी :- जग असत्य तरी समाज कल्याणार्थ कार्यात गुंग.

अप्रतीष्ठम अनीश्वरम :- नास्तिक लोक
श्लोक ९ त्याचे परिणाम :- उग्रकर्म :- वासुकीचा पुढचा भाग पकडणे म्हणजे अशी कार्ये करणे ज्यात कुणाचाच फायदा होणार नाही.
श्लोक १० त्यांचा आश्रय म्हणजे काम. जे या तात्पुरत्या दुःखालायला शाश्वत सुखालय बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्य:- अशुचीव्रता:- अस्वच्छतेचा व्रत घेतल्याप्रमाणे वागणे.

श्लोक ११-१२ त्यांचे शोध कार्य म्हणजे मानव समाजाला प्रगतीसाठी इंद्रियतृप्ती सगळ्यात आवश्यक आहे. पण इंद्रिय विषय हे आपल्या नियंत्रणात नसतात कारण ते शरीरा बाहेर आहेत. म्हणून चिंता अपरीमेयाम , अमर्याद चिंता आणि भय. स्त्रीला आकर्षित करण्यास पुरुष त्याच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करतो आणि पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्त्री तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करते. पण जेव्हा हे दोन्हीही शक्य होत नाही तेव्हा आसुरी व्यक्ती अवैध मार्गांचा उपयोग करतात.

श्लोक १३-१५ केंद्र बिंदू :- ईश्वरोहम अहं भोगी

श्लोक १६ :- दिशाभूल किंवा भ्रमित झाल्याने

नाम यज्ञे : फक्त नाममात्र यज्ञ करणे.