कर्म संन्यास योग

अध्याय ५ ……कर्म संन्यास योग

१) ‘ज्ञानयुक्त संन्यास’ आणि ‘भक्तियुक्त कर्म’ या दोन मुद्यांचे स्पष्टीकरण द्या?
मोक्ष प्राप्तीसाठी दोन्हीही उपयोगाचे आहेत कारण त्यांचे ध्येय एकच आहे. एक म्हणजे झाडाचे मूळ शोधणे आणि दुसरे म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घालणे. पण भक्तियुक्त कर्म ज्ञानयुक्तसंन्यासापेक्षा सोपे आणि उत्तम आहे. शरीर आणि आत्मा यांचे ज्ञान प्राप्त करून कर्म संन्यास घेण्याला ज्ञानयुक्त संन्यास म्हणतात. आणि सर्व ज्ञान प्राप्त करतांना भगवंतांसाठी सर्व भक्तिमय कर्म करणे म्हणजे “ भक्तियुक्त कर्म” होय.

२)’मायावादी’ आणि ‘वैष्णव संन्यासी’ यांमधील काही फरक स्पष्ट करा?
मायावादी संन्यासी :- पहिले विहित कर्म करून ह्रदय शुद्ध करणे आवश्यक आहे, फक्त ज्ञानाच्या जोरावर मुक्ती ( ब्रह्मज्योति)मिळवणे.पतनाची भीती असते कारण इंद्रियांना कार्ये नाहीत. हि पद्धत म्हणजे १. सर्व श्रुष्टीचे मूळ श्री विष्णू आहेत हे शोधून काढणे. २. सर्व जड पदार्थांपासून विरक्ती निर्माण करणे. ३. नैती नैती म्हणून इंद्रियांना कुठल्याच प्रकारचे सुख न देणे, त्यामुळे जीवनात कुठलाच आनंद नसणे. ४. जीव सदैव कार्यशील असल्यामुळे ब्रह्मज्योतीतून पतन होवून परत परोपकारी आणि जनकल्याणार्थक कार्यात प्रवृत्त होण्याची भीती असते.
वैष्णव संन्यासी :- पूर्व शुद्धीकरणाची आवश्यकता नाही कारण हि पद्धतच शुद्धीकरणआहे. भक्तिमय सेवेद्वारे भगवत धामात प्रवेश मिळवणे. यशाची नक्की (नेहभिक्रमनाशोस्ती ). १. श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी सर्व कर्म करणे. २. श्रीकृष्णाशी आसक्त होणे. ३. इंद्रिये विविध सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे आनंदी असतात.५. सर्व जीवन बऱ्याच भक्तिमय सेवेमध्ये मग्न असल्याकारणाने इतर मार्गांमध्ये मार्गभ्रष्ट होण्याची भीती नसते.

३) निष्काम कर्म योग कसा करावा आणि त्याचा परिणाम काय होईल?
ज्ञान असलेला मनुष्य जाणतो कि प्रकृतीशी तो अनुरूप नाही त्यामुळे तो भौतिक परिणामापासून अनासक्त होऊन फक्त स्वतःच्या शुद्धीकरणासाठी कार्य करतो.
१. तो सर्व जीवांना भगवंतांचा नित्य अंश म्हणून पाहतो आणि सर्वांची सेवा करण्यास तत्पर असतो त्यामुळे सर्व जण त्याला प्रिय असतात.
२. तो जाणतो की भौतिक कार्ये ही इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संपर्काव्यतीरिक्त काही नाही. म्हणून तो आपल अस्तित्व शुद्ध ठेवण्यासाठी भौतिक गोष्टींपासून सदैव अलिप्त आणि स्वतंत्र राहतो.
३. जीव हा भौतिक दृष्ट्या निष्क्रिय आहे हे तो जाणतो.
४. तो भक्ती मार्गापासून विचलित होण्याची शक्यता नसते कारण त्याचे मन आणि इंद्रिये सदैव भक्तिमय सेवेत संलग्न असल्यामुळे संयमित असतात.
५. सर्व कर्मफळ तो भगवंतांना अर्पण करतो कारण तो जाणतो की शरीर भगवंतांची देणगी आहे, आणि त्याचा योग्य उपयोग त्यांच्या सेवेतच होईल.
६. तो शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिये या सर्वांचा उपयोग फक्त स्वतःच्या शुद्धीकरणासाठी करतो.
परिणाम रुपी:-
१. त्याला कुठलेच पाप लागत नाही कारण ज्याप्रमाणे कमळ हे चिखलात असूनही कधीच मलीन होत नाही त्याच प्रमाणे त्याचे कार्य पापयुक्त होत नाही.
२. तो कधीही कर्मबद्ध होत नाही कारण त्याचे कार्य मन आणि इंद्रिये तृप्त करण्याच्या इच्छेने प्रेरित नसुन, श्री कृष्णांच्या इच्चेनुसार असतात.
३. तो पूर्ण शांती अनुभवतो कारण त्याला फळाची चिंता नसते.

४) “अणु” आणि “विभू” यातील फरक सांगा?आत्मा अणु आहे:- शाश्वत, नित्य आनंदात असतो फक्त मायेच्या प्रभावाखाली कष्ट भोगतो. तो स्वतःच्या शरीराचा जाणकार आहे. आकारात अणु आहे. त्याला इच्छा करण्याचे अगदी थोडे स्वातंत्र्य असते पण तरीही ती इच्छा पूर्ण होण्यास परमात्म्यावर तो अवलंबून असतो.
परमात्मा हा विभू आहे:- शाश्वत, त्रिगुणातीत, नित्य आनंदी अवस्थेत असतो. तो सर्वांच्या शरीराचा जाणकार आहे. त्रिकालज्ञ, पूर्णतः स्वतंत्र आहे.

५) आत्मा , परमात्मा आणि प्रकृती यांच्यातील संबंध स्पष्ट करा?
आत्मा इच्छा करतो, परमेश्वर त्यात ढवळाढवळ करत नाही. आत्मा ज्या इच्छासाठी पात्र आहे त्या इच्छेसाठी परमात्मा परवानगी देतात. परमात्मा सर्व कार्ये प्रकृतीद्वारे पार पडतात. प्रकृतीचे तीन गुण ती इच्छा पूर्ण करण्यास सर्व सुविधा प्रदान करतात. या सर्वाला कारणीभूत कोण आहे? इच्छा निर्माण करणारा आत्मा कारणीभूत आहे, जरी परमात्मा परवानगी देतात आणि प्रकृती सुविधा प्रदान करते तरी दोन्हीही कारणीभूत नाहीत. आत्मा त्याच्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांसाठी आणि त्यांच्या परिणाम भोगण्यासाठीकारणीभूत असतो.परमात्मा सर्व कार्यांचा अंतिम नियंत्रक असले तरी प्रारम्भक नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर सर्व अंधकार नाहीसा होतो त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा-ज्ञान प्राप्त केल्यावर भक्त परमेश्वराला शरण येतो आणि खरा आनंद आणि शांती प्राप्त करतो.

६) आत्मसाक्षात्कारी व्यक्तींचे गुणधर्म सांगा?
अ)आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचा दृष्टीकोण १८-२२
सर्व प्राणीमात्रांना एकाचा दृष्टीकोनातून बघतो , ते भगवंतांचे नित्य अंश आहेत हे जाणतो.
त्याला प्रकृती/ जड वस्तूंबद्दल आकर्षण किंवा तिटकारा नसतो.
भौतिक घडामोडींबद्दल हर्ष किंवा शोक करत नाही.
परम सत्याला ३ विविध अवस्थांमध्ये जाणतो.
इंद्रिय तृप्तीला कधीही बळी पडत नाही कारण तो हे जाणतोकी इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी संबंध हा दुःखाला कारणीभूतठरतो आणि भौतिक अस्तित्व वाढवतो.
तो ज्ञानरूपात स्वतःतच सर्वोच्च आनंद प्राप्त करतो. आत्मज्ञानाची उच्चतर गोडी प्राप्त करतो.
ब)आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य कार्ये.
इच्छा आणि क्रोध आणि इंद्रियांचे आवेग सहन करतो. (२३) पणते कशाप्रकारे
तर तो त्याची कार्ये, त्याचा आनंद आणि त्याचे ध्येय अंतर्मुख करतो. (२४)
दुसर्यांच्या कल्याणार्थ कार्य करून तो स्वतःची बाह्य कार्ये शुद्ध करतो. (२५ )
परमात्म्यावर ध्यान करून तो लवकरच भविष्यात मोक्षासाठी पात्र होतो.

७) शांतीचे सूत्र काय आहे?
शांतीचे सूत्र हे जाणणे आहे की :- १ भोक्ताराम यज्ञ तपसाम:-श्रीकृष्ण सर्व यज्ञांचे आणि तपश्चर्येचे लाभार्थी आहेत. म्हणून सर्व गोष्टी त्यांना सेवाभावाने अर्पण करावे.
२ सर्व लोक महेश्वरम :- श्रीकृष्णचौदा लोकांचे आणि सर्व देविदेवतांचे सर्वोच्च स्वामी आहेत.
३ सुह्र्दम सर्व भूतानाम :- श्रीकृष्णसर्व जीवांचे हितचिंतक आहेत.
८) ‘कमलपत्राचे उदाहरण कशा संदर्भात दिले आहे हे स्पष्ट करा?(५.१०) या श्लोकाचेभाषांतर वाचून उत्तर लिहणे.

9)बुद्धीमान व्यक्ती इंद्रीयातृप्तीत भाग का नाही घेत?त्यासाठी तो काय करतो?( ‘ये हि संस्पर्शजा भोगा’ या श्लोकाचे भाषांतर लिहिणे )