अक्षरब्रह्मयोग ( भगवत्प्राप्ती )

अध्याय आठवा

अक्षरब्रह्मयोग ( भगवत्प्राप्ती )

सातवा अध्यायात आपण बघितले की

1) मूढ: गाढव जे अध्यात्मिक ज्ञान समजू शकत नाही.
2) नराधम: समजतात पण ते पालन करायची त्यांना काहीच इच्छा नाही
3) मायया अपहृत ज्ञाना: आपल्या बुद्धीवर खूपच जास्त घमेंड ओवर कॉन्फिडेंस
4) असुर :द्वेषी नास्तिक आणि मायावादी

आर्त :- गजेंद्र, जिज्ञासू – शौनक , अर्थार्थी – ध्रुव , ज्ञानी – चतुष कुमार

ज्ञानी सर्वात प्रिय आहे आणि बाकी सर्व ते अनेक जन्मानंतर मला संपूर्ण पणे शरण येतात. असा महात्मा खूप दुर्लभ आहे कारण तो जाणतो की सर्व काही माझ्या पासून निर्माण होते आहे म्हणून तो सर्वांना शरण जात नाही तर माम प्रपद्यन्ते “ मला शरण येतो.
इतरांचे काय देवता उपासक : मी ( परमात्मा रुपात )त्यांना देवतांबद्दल श्रद्धा देतो आणि देवतांनाही त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची सुविधा देतो. हळूवार लिफ्ट

जमीनदार सेवा— देवतांची पूजा ( अधिकारी म्हणून वेदांच्या घरात )— कृष्णाची पूजा इच्छा पुरती साठी — फक्त प्रेमासाठी
देवतांची उपासना उत्तम हेतूने १) वल्लभाचार्य शिवजी – कृष्ण विग्रह २) गोपी ३) केशव काश्मिरी ४) महाराज शिव मंदिर
अल्प मेधासम का म्हटले आहे अन्तवत्तु जे मागतात आहे ते नष्ट होणार आहे. उदा. घर आणि कार २ दिवसासाठी

आता आठवा अध्याय
योग मिश्र भक्त उपासक
विभाग १-४ कृष्ण अर्जुनाच्या सहा प्रश्नांची उत्तरे देतात
विभाग ५-८ :- मृत्यू समयी कृष्ण स्मरण, सातव्या प्रश्नाचे उत्तर
विभाग ९- १३:- योगमिश्र भक्ती द्वारे कृष्ण स्मरण
विभाग १४-१६:- शुद्ध भक्ती द्वारे कृष्ण स्मरण
विभाग १७-२२ :- भौतिक आणि अध्यात्मिक जगाची तुलना करून कृष्ण स्मरण
विभाग २३- २८ :- भक्तीयोगाद्वारे कृष्ण स्मरण सर्वात सोपे

या अध्यायात कृष्ण भक्ती योगाची कीर्ती प्रस्थापित करतील

सातव्या अध्यायाच्या शेवटी ७.२९-३० यात बरेच शब्द अर्जुनाला अनोळखी वाटले म्हणून तो कृष्णाला ८ प्रश्न विचारतो आहे. कृष्ण त्याला पहिले ७ उत्तर देतात आणि नंतर आठव्या प्रश्नाचे उत्तर विस्तारित रुपात देतात.

या अध्यायात आपण बघणार आहोत :- योग-मिश्र भक्ती , शुद्ध भक्ती आणि जीवाला एक शरीर सोडल्यावर दुसर शरीर कुठल्या आधारावर मिळते.

ब्रह्म:- अविनाशी जीवाला ब्रह्म म्हटले जाते. भगवंत आणि जीव दोन्हीही अविनाशी आणि शाश्वत आहेत म्हणून दोघानांही ब्रह्म म्हटले आहे पण भगवंत पर-ब्रह्म आहेत.

अध्यात्म :- जीवाच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हटले जाते. ( भगवंतांची सेवा )

कर्म:- जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात.

भौतिक भावना म्हणजे प्रकृतीवर प्रभुत्व गाजविणे जे विविध प्रकारच्या कर्मांना आणि शरीरांना
कारणीभूत ठरतात. पण अध्यात्मिक भावना म्हणजे भगवंतांची सेवा करणे होय ज्याने सर्व कर्म बंधनातून सुटका होते.

जीव हा तटस्थ आहे कारण बरेचदा तो जड वस्तू शी संबंध जोडतो आणि स्वतःला शरीर समजतो. असे केल्याने त्याला ८४ लक्ष शरीरांपैकी एखाद शरीर स्वीकाराव लागत आणि हे शरीर त्याला त्याच्या कर्माच्या आधारावर मिळत. काही यज्ञ करून तो स्वर्ग लोक प्राप्ती साठीही प्रयत्न करतो. आणि कधी तो त्याच्या मूळ स्वभावात असतो म्हणजे अध्यात्मिक शरीरात कृष्णाची सेवा करतो.
कृष्ण अच्युत आहेत त्यांचे कधीच पतन होत नाही पण जीवाचे पतन होवू शकते.

कशाप्रकारे—
छांदोग्य उपनिषदानुसार स्वर्ग प्राप्ती साठी पंचाग्नी यज्ञ केले जाते ज्यात पाच प्रकारच्या अग्नीत पाच प्रकारच्या आहुती दिल्या जातात. या यज्ञा मुळे जीवाला त्या विशिष्ट स्वर्गाची प्राप्ती होते पण तिथे अमर्याद इंद्रिय तृप्ती नंतर जेव्हा त्याचे पुण्य कर्म समाप्त होते तेव्हा तो पर्जन्याच्या रुपात पृथ्वीवर परत येतो आणि धान्याचे रूप धारण करतो. मनुष्य ते धान्य खावून त्याचे विर्यात रुपांतर करतो आणि त्याने स्त्रीला गर्भ धारणा होते आणि जीव पुन्हा देह प्राप्त करतो.

अधिभूत:- निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. सहा परिवर्तन जन्म , वाढ , काही काळ राहणे, प्रजनन , क्षय आणि मृत्यू.

अधिदैव:- भगवंतांच्या विराट रूपाला अधीदैव म्हणतात, ज्यात सर्व देवतांचा आणि त्यांच्या लोकांचा समावेश आहे .

अधीयज्ञ:- प्रत्येक जीवाच्या ह्रदयात भगवंत परमात्मा रुपात निवास करतात , त्यांना अधीयज्ञ म्हणतात. जो सर्व यज्ञाचा भोक्ता आहे.

यज्ञपती इंद्र आणि विष्णू दोघांनाही म्हणतात पण अर्जुन नन्तर विचारतो आहे की हा य ज्ञ पती जीवाच्या शरीरात कसा वास करतो? त्यावरून हे निश्चित होते की इथे विष्णूंचा उल्लेख केला आहे.

‘प्रयाण काले’ या शब्दाचे महत्व काय?
आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते. ज्या गोष्टींशी आपण आसक्त असतो त्याच गोष्टी आपल्याला दुःखासमयी आठवतात. मृत्युसमयी सर्व शारीरिक कार्ये विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. अशा व्याकूळ मनस्थितीत भगवंतांचे स्मरण करणे खरच कठीण असते मुख्यतः जर आयुष्यभर कधीच त्याचा सराव केला नसेल तर.

५ मृत्यू समयी कृष्ण स्मरण शेवटचा विचार तत्त्व आणि पुढला श्लोक सामान्यतः तत्व दर्शविते. उदा भरत महाराज

६ सूक्ष्म शरीर आपले भूत आणि भविष्य दर्शविते. भीती किंवा तणाव आल्यावर मला कोणी आश्रय आणि दिलासा दिला हा अनुभव व्यक्ती लक्षात ठेवतो. जोपर्यंत आपल्याला कृष्णावर तो विश्वास नाही तो पर्यंत आपण कठीण समयी त्यांचे स्मरण करणे शक्य नाही म्हणून दैनंदिन समस्यां मध्ये आपण कृष्ण स्मरण करण्यास सुरुवात केली तर आपल्याला अनुभव येतील आणि विश्वास उत्पन्न होवून आपल्याला ती सवय लागेल.
महाराज कुलशेखर प्रार्थना करतात की “ आता तरुण असल्याकारणाने कुठल्याच अडचणी शिवाय तुमचे नाम जप करू शकतो म्हणून मला त्वरित मृत्यू आला तर बरे होईल नाही तर वृद्ध अवस्थेत हे शक्य नाही.”

७ सर्वेषु कालेषु – खूप कठीण आहे. गीता ३.३० जे काही करतो आहे ते मला अर्पण कर आणि इथे माझा स्मरण कर आणि युद्ध कर.
जननिवास प्रभू : आवडती सेवा करताना आपण स्वतःला कर्ता समजतो आणि कठीण सेवा आली की कृष्ण आठवतात. म्हणून निदान सेवेच्या आधी आणि सेवे नंतर तरी कृष्ण स्मरण करणे.
शुद्ध भक्त बाह्य रित्या भौतीक् कार्य करतांना दिसतील पण त्यांचे चित्त कृष्ण स्मरणात असते.
उदा भक्ताला प्रभुपाद रागावतात पण नंतर कीर्तन करतांना दिसतात.
साधक बाह्य वर्तुळ अध्यात्मिक आणि आंतरिक भौतिक
मय्यार्पीत मनो बुद्धिर :- आपल्याला आपले सुक्ष्म शरीर अर्पण करायचे आहे उदा स्त्री किंवा पुरुष जेव्हा अवैध संबंध ठेवतो, तेव्हा त्याचे चित्त हे प्रियकराला देलेले असते.

८ अभ्यास , अनु चिन्तयन –विचारयुक्त स्मरण
योग मिश्र भक्तासाठी कृष्ण स्वतःचा उल्लेख परमात्मा म्हणून करतात , १८.६२ भक्तासाठी माम एकम शरणं व्रजाम
उदा प्रभुपाद म्हणतात 1) जयपूर पंडाल विदेशी भक्त नाही, अमेरिकी आणि युरोपिअन शिष्य , आणि 2) बरेचदा तुम्ही सर्व माझे गुरु आहात.