राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९

राजविद्या राजगुह्य योग

आठव्या अध्यायामध्ये आपण बघितले कि १) कशा प्रकारे अनन्य भक्त मुक्तीसाठी दिवसा आणि रात्रीचा शरीर सोडण्याचा मार्ग टाळतो. या अध्यायत आपण बघू, असा भक्त कसे बनावे २) भक्ती हि सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे तर ऐथे हा योग कशाप्रकारे करावा याचे ज्ञान दिले जाईल.

विभाग १-३ श्रवण पात्रता आणि अपात्रता निर्मत्सरी आणि श्रद्धाळू व्यक्ती कृष्णाच्या अत्यंत गोपनीय ज्ञान श्रवण करून त्यांना प्राप्त करू शकतोपण अश्राधाळू व्यक्ती मात्र जन्म आणि मृत्यू यांच्या जाळ्यात सतत अडकून बसेल.

विभाग ४-१० ऐश्वर्य ज्ञान :- कृष्णाचा भौतिक जगाशी संबंधकृष्ण त्यांच्या भौतिक शक्ती निशी संपूर्ण जग व्यापतात, निर्मिती करतात आणि नष्ट करतात.

त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय भौतिक जगात एक पान ही हालत नाही तरी कृष्ण अनासक्त आणि एदासिनवत असतात कारण सर्व गोष्टी त्यांच्या शक्तीनिशी पार पडतात.

विभाग ११-२५ मूर्ख लोक भक्तीचा अस्वीकार करतात पण दैवी लोक स्वीकारतात
दुरात्मा , महात्मा , अप्रत्यक्ष उपासक ( एकत्वेन , पृथक्त्वेन आणि विश्वतो मुखं )

विभाग २६-३४ कृष्ण भक्तीची कीर्ती

भक्ती सर्वात सोपि असुनही तीचे फळ मात्र सर्वोत्तम आहे.
कृष्णाला भक्त किती प्रिय आहेत. त्यांच्या हातून चुकून घोर पाप झाले तरी भगवंत त्यांना सोडत अन्ही तर असा भक्त सदैव महात्माच राहतो.
भक्ती भेद न करता उच्च आणि नीच अशा सर्व जीवांना शुद्ध करू शकते.

१ सर्वात गोपनीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय पात्रता हवी ? निर्मत्सरता
कसे श्रवण करावे ? लक्ष पूर्वक उदा. सी वी रमण
असे केल्याने काय होईल? भौतिक जगाच्या सर्व बंधनातून सुटका मिळेल.

२ राजा विद्या :-
राजा गुह्यं :- ,पवित्रं इदं उत्तमम :- ,प्रत्याक्षा व्यागमाम:- , धर्म्यं :
सु सुखं

३ अध्यात्मिक प्रगती साठी श्रद्धा असणे सर्वात महत्वाचे आहे. श्रद्धा कशी निर्माण होईल ; भक्तांच्या संपर्कात राहिल्याने .
व्याख्या :- श्रद्धा शब्दे
उदाहरण :- झाडाच्या मुळाला पाणी घालणे आणि पोटाला अन्न पुरविणे
अश्रधाळू व्यक्तींची गती काय आहे? पुन्हा जन्म घेणे
विभाग ४-१० :- कृष्णाचे अचिंत्य ऐश्वर्य ऐकल्यावर आपला त्यांच्या बद्दल आदर वाढेल आणि भक्ती करायची इच्छा जागृत होईल. कृष्णाचा या भौतिक जगाशी कसा संबंध आहे?

४ :-“ मी या संपूर्ण जगाचा आधार आहे आणि माझ्या शक्तींद्वारे मी सर्वव्यापी आहे.” अप्रकट रुपामध्ये म्हणजे आपल्या चार्म चक्षुंनी आपण त्यांना बघू शकत नाही. जो भक्तीत निपुण झालेला आहे आणि त्यामुळे त्याचे ह्रदय शुद्ध झाले आहे फक्त असा व्यक्ती भगवंतांना बघू शकतो. उदा. १) भक्ती रसामृत संधू “ अतः श्री कृष्ण नामादी ना भवेत ग्राह्यं इंद्रिये सेवन मुखेही जीह्वादौ स्वयं एव स्पुरत्या अदा “ २) ब्रह्मा संहिता “ प्रेमाजन छुरीत भक्ती विलोचनेन संत सदैव ..”
“ सर्व जीव माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही “ म्हणजे भगवंतांनी हे विश्व व्यापल्या मुळे त्याचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट झालेले नाही. उदा. राजा हा त्याच्या शक्ती द्वारे सर्वत्र शासन करतो पण व्यक्तीशः तो सर्वत्र हजर नसतो. आपल्या मंत्र्यन्द्वारे तो सर्व काही जाणतो.

५ :- इथे भगवंत म्हणतात ” मी जे काही निर्माण केले आहे ते माझ्यात नाही “ म्हणजे जरी सर्व काही त्यांच्यावर अवलंबून आहे तरी ते प्रत्यक्षात या जगाचे नियंत्रण करत नाही. ते अलिप्त आहेत. उदा. १) atlas च्या पुतळ्यासारखे नाही की काय मोठा भार आहे माझ्या खांद्यावर. २) सर्व लोक ( planets) अंतराळात तरंगतात आहेत पण अंतराळ ही भगवंतांची एक शक्ती आहे भगवंत अंतराळ नाहीत.
इथे मायावादी युक्तिवादाचे खंडन होते. त्याचं म्हणन आहे भगवंत सगळीकडे व्यापलेले आहे म्हणून सर्व काही पूजनीय आहे पण भगवंत म्हणतात मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यात आहे तरी मी अलिप्त आहे कुठे गोलोक वृंदावनात लीला करत.

६:- हे योग ऐश्वर्य समझण्यासाठी भगवंत एक उदाहरण देतात की कसा मी या जगाचा पालनकर्ता आहे आणि तरी अलिप्त आहे , माझ्यावर या गोष्टींचा काही फरक पडत नाही.
आकाश एका उलट्या बशी प्रमाणे आहे आणि त्यात हवा आपल्या स्वातंत्राचा पूर्ण फायदा घेत सर्वत्र फिरत असते. मोठे ढग वाहून नेणे , सुगंध किंवा दुर्गंध पसरविणे इत्यादी चमत्कारिक कार्ये हवा करत असेल तरी हवेची मर्यादा म्हणजे आकाशापर्यंतच सीमित असते. तिच्या चमत्कारिक कार्यांचा आकाशाला काही परिणाम होत नाही तर रात्री हवेला आकाशाचाच आश्रय घ्यावा लागतो. तसेच भगवंतांच्या इच्छे नुसार सर्व गोष्टी होत आहेत तरी ते अलिप्त आहेत आणि त्यांच्यावर या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही.

७ & ८ :- त्यांच्या इच्चेनुसार हे जग वारंवार, आपोआप निर्माण केले जाते आणि नष्ट केले जाते.
पण म ही निर्मिती आणि प्रलय भगवंतांना बद्ध करतो का?

९:- नाही या जगातील चांगल्या वाईट गोष्टींना भगवंत कारणीभूत नाहीत तर ते उदासीन ( तटस्थ )आणि सदैव अनासक्त आहेत. आपण साधारण गोष्टीची निर्मिती केली तरी त्याला आसक्त होतो “ मी केल आहे हे”. “फोटो काढतो, facebook वर टाकतो “ भगवंतांना काही आसक्ती नाही. तरी त्यांचे नियंत्रण सर्व गोष्टींवर आहे. उदा. न्यायाधीश असंख्य निर्णय घेत असतो तरी तटस्थ असतो. कुठल्याच फायदा आणि नुकसानात त्याला आसक्ती नसते. जीव आपल्या पूर्व कर्म आणि इच्छेनुसार विविध शरीर प्राप्त करीत असतात. त्यात भगवंत ढवळाढवळ करत नाही.

१०:- शेवटी सर्व काही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली होत असते आणि त्यांच्या तर्फे भौतिक प्रकृती हा कारभार सांभाळते. उदा. १) कृष्ण पिता आहेत आणि प्रकृती माता आहे. भगवंत कटाक्ष टाकतात आणि जीव या भौतिक जगात आपल्या कर्म आणि इच्चेनुसार विविध शरीर धारण करतात. २) स्मृती :- मनुष्य फुलाचा सुगंध घेतो पण त्याची वास घेण्याची प्रक्रिया आणि फुल यांचा काहीच संबंध नाही. त्याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती मध्ये आहे.
विभाग ११-२५ आपल्या अध्यात्मिक पातळीनुसार विविध व्यक्ती श्री कृष्णांची उपासना करतात.

११ मूर्ख लोक भगवंतांच्या ऐश्वर्य ज्ञाना अभावी त्यांना साधारण मनुष्य समझतात. या भौतिक जगाची अप्रतिम निर्मिती करणारा कशाप्रकारे साधारण असू शकतो हे त्यांना समजत नाही. कृष्ण आणि बलराम यांनी (superhuman acts) असाधारण कार्ये केली जी कोणीच करू शकत नाही. कृष्णाने अवतरीत झाल्यावर पहिले चतुर भूज रुप धारण केले. ३) अर्जुनाला विराट रूप दाखविले. मोठ मोठे वेदिक विद्वानही या ज्ञाना अभावी भगवंतांना जाणू शकत नाही म्हणून त्यांना मूर्ख म्हणून संबोधण्यात आले आहे.

१२:- अशा व्यक्तींची गती काय आहे? जे व्यक्ती कृष्णाला कमी लेखतात ते नास्तिक आणि आसुरी वृत्तीला आकर्षित होतात. आणि त्यांची मोक्षाची आशा, त्यांचे कर्म आणि ज्ञान सर्व काही धुळीत मिळते.
म जे कृष्णाचा आदर करतात ते कोण आहेत?

१३ & १४ महात्मा :- ते सदैव दैवी प्रकृतीत स्थित असतात आणि पूर्णपणे भगवंतांना शरणागत असतात.
त्यांची काही लक्षणे काय आहेत?
१) कृष्ण शिवाय ते आपले लक्ष कुठेच नेत नाही. म्हणजे विष्णूंकडे ही आकर्षित होत नाही.
२) ते कृष्णाच्या साकार रुपाला आकर्षित असतात आणि त्यांचे दिव्य गुणगान करत असतात.
३) भक्तीत प्रगतीसाठी त्यांचा निर्धार असतो उदा. एकादशी व्रत करणे इत्यादी.
४) कुठल्याच प्रकारचा त्याग किंवा तप न करता गुरूंच्या आदेशाखाली ते सर्व कर्म करत असतात.
५) मन ,शरीर आणि वाचा या सर्वांचा उपयोग फक्त भगवत सेवेत करतात.

१५:- ३ प्रकारचे अप्रत्यक्ष कृष्ण उपासक
एकत्वेन :- ते स्वतःचीच उपासना करतात. सर्वात प्रख्यात आणि खालच्या स्थराची उपासना. यात प्रामुख्याने निर्विषेश्वादी लोकांचा समावेश असतो.यांची गती ११ & १२ व्या श्लोकात दिली आहे.
पृथक्त्वेन:- मनोनिर्मित एखाद्याला देव मानणे आणि त्यांची पूजा करणे.
यात देवतांचा समावेश येतो २०-२५ श्लोकात यांची चर्चा केली आहे.
विश्वतो मुखं :- विराट रुपाला भगवंत मानणे तिघांपैकी सर्वोत्तम पद्धत. जे व्यक्ती जड वस्तू शिवाय काहीच समजू शकत अन्ही ते हि पद्धत वापरतात. १६ ते १९ श्लोकात चर्चा केली आहे.

२०-२५ देवता उपासक
देवता उपासक कृष्णाचीच उपासना करतात पण अप्रत्यक्षरीत्या . वेद पठण करतात, पापातून मुक्त होतात , स्वर्गात जन्म घेतात , आणि सोमरस पितात , पुण्य कर्म समाप्त झाल्यावर परत मर्त्य लोकात जन्म घेतात. उदा. circus wheel , हर्ष –शोक , स्वर्ग – पृथ्वी

२२ जे कृष्णाची प्रत्यक्ष उपासना करता त्यांना कृष्ण कृपेने काय लाभ होतात? “करोमि” नाही तर “वहामी”
योग:- जे पूर्णपणे कृष्णाचा आश्रय घेतात त्यांच्या गरजा कृष्ण स्वतः पूर्ण करतात आणि क्षेम:- त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण कृष्ण स्वतः करतात.
प्रत्येक क्षणी आपण आपले नशीब बनवतो आहे आणि पाप कर्म पश्चाताप केल्याशिवाय माफ होणार नाही. देवता जीवांचे नशीब बदलत नाही पण त्याचा क्रम बदलू शकतात. पण त्याचा परिणाम भविष्यात जास्त प्रमाणात होवू शकतो जर आपण कनिष्ठा गुणांच्या सहवासात राहिलो तर. आपण परिणामाला कसा प्रतिसाद देतो त्यावर दुःख किंवा आनंद अवलंबून आहे. सत्त्व गुण परिणाम कमी करू शकतो आणि तमो गुण त्याला वाढवू शकतो.उदा. शरीराची काळजी घेतली नाही आणि आजारी पडलो तर औषध घेणे पण ते केले नाही तर आजार वाढेल.

२३ देवतांची उपासना जरी कृष्ण उपासनाच असली तरी ती अविधीपुर्वक असल्यामुळे त्यांना भक्तांप्रमाणे फळ मिळत नाही. उदा. १) झाडाच्या पानांना आणि फुलांना पाणी घालणे २) पोटाला अन्न न पुरवता इतर अवयवांना पुरविणे. ३) सरकारी नियम पालन न करणे आणि अधिकाऱ्यांना लाच देणे.

२४ जे हे जाणत नाही की कृष्णच फक्त भोक्ता आहेत आणि सर्व यज्ञांचे भोक्ते आहेत , “ यज्ञार्थातकर्मणो अन्यत्र “ भोक्ताराम यज्ञ” अशा व्यक्तींचे फक्त पतन होते. “च्यवंती ते”

२५ कृष्ण उपासना सोडून इतर ज्या व्यक्तीची उपासना कराल, तुम्ही त्याच्या धामात प्रवेश कराल. आणि विविध गुणांनुसार तुम्हा प्रत्येकाला परिणाम भोगावे लागतील. उदा . सर्व जनावर तमो गुणी आहेत पण त्यातल्या त्यात गाय= सत्त्व , हत्ती = रजो , आणि बकरी =तमो त्याच प्रमाणे देवांमध्ये विष्णू= सत्त्व , ब्रह्मा = रजो आणि शिव= तमो गुणांचे अधिकारी आहेत.
“जतो मत ततो पथ” या युक्तिवादाचे इथे खंडन होते.

विभाग २६-३४ कृष्ण भक्तीची कीर्ती
२६ भक्ती सर्वात सोपी आणि सर्वत्र सर्वांसाठी उपलब्ध पद्धत आहे.

२७ जर तुमच्यात ती भक्ती नाही तर तुमचे कर्म मला अर्पण करा. कृष्ण “ मी ते स्वीकारतो” असे म्हणत नाही, जे पूर्वीच्या श्लोकात म्हणतात.

२८ अशा प्रकारे तुझे मन माझ्यावर केंद्रित केल्यावर शुभ आणि अशुभ परिणामातून मुक्ती आणि माझ्या धामात प्रवेश. विमुक्ती आणि मम उपैस्यसी

२९ सर्वांसाठी समान उदा.१) पिता दानी पण स्वतःच्या मुलाची विशिष्ठ काळजी २) सर्व जीव कृष्णांचे पुत्र आहेत हो त्यामुळे ते सर्वांना अन्न वगैरे देतात उदा. ढग सगळीकडे पाऊस पाडतात दगड,शेत, समुद्र पण काही झाडे विषारी असतात आणि विषारी फळ देतात.
पण जेव्हा जीव कृष्णाची उपासना करतात तेव्हा सोन्यासारखे भक्त हिऱ्यासारख्या कृष्णाबरोबर शोभून दिसतात.

३० अनन्याभाक म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती ,असा भक्त जरी चुकून घृणास्पद कार्य करतो तरी कृष्ण त्याला महात्मा मानतात कारण तो भक्तीत स्थित आहे आणि त्वरित शुद्ध होईल कारण तो कृष्णाशिवाय दुसर्या कुठल्याच व्यक्तीचा किंवा योगाचा आश्रय घेत नाही.
मन्तव्य म्हणजे हा माझा आदेश आहे , आणि जो अशा भक्ताला कमी लेखात नाही तो लवकरच महात्मा होतो.
पण याचा गैर फायदा घेवू नये कारण मायेच्या प्रभावाने झाली चूक माफ केली जाते मुद्दाम केलेली नाही.

३१ तो त्वरित योग्य मार्गावर स्थित होतो कारण तो सतत माझे नाम जप करतो. त्याला शाश्वत शांती प्राप्त होते आणि माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही हे माझे वचन आहे.

३२ कृष्णाच्या कृपेने अपात्र वर्गातील व्यक्तीही त्यांना प्राप्त करू शकतात.

३३ तर ब्राह्मण, भक्त आणि राजर्षी यांच्या बद्दल काय सांगायचे. म्हणून या तात्पुरत्या आणि दुःखाने भरलेल्या भौतिक जगात आल्यावर माझ्या प्रेममयी सेवेत संलग्न व्हा.
जग हे असत्य ( मायावादी युक्तिवाद) नसून थोडा काळ टिकणारे आहे.
भक्ती हा एकच योग सर्व दुःखांचा नाश करणारा सर्व जीवांसाठी, सर्व काळ उपलब्ध असणारा असा योग आहे.

३४ म्हणून माझी प्रत्यक्ष उपासना करा कशी , मला दंडवत करा, मन माझ्यात केंद्रित करा, माझे भक्त व्हा.