Marathi NOD Chapter 4

अध्याय ४.

मोक्षापलीकडील भक्तिमय सेवा

वैधी साधना भक्ती सुरुवात करण्यासाठी काय हवे:- भक्तांची कृपा

वैधी साधना भक्तीत प्रगती साठी काय हवे:- शास्त्राचे उत्तम ज्ञान आणि शास्त्रंवर अढळ श्रद्धा

शुद्ध भक्तिमय सेवा करण्यासाठी काय हवे:- भौतिक संकल्पनेतून मुक्ती, सर्व भौतिक इच्छांचा त्याग आणि मुक्तीचा त्याग.

उदा. भूत आणि पिशाच , मुक्ती हात जोडून भक्तासाठी उभी असते इत्यादी

प्रामाणिक भक्त प्रगतीसाठी कशाप्रकारे भौतिक इच्छा ( भुक्ती) आणि मोक्ष ( मुक्ती) याचाही स्वीकार करत नाही याचे काही शास्त्रिक प्रमाण.

निस्वार्थ भक्तिमय सेवेसाठी हे अनिवार्य आहे.

भक्ताने भौतिक इच्छा आणि मोक्ष त्याग केला यावरून आपण समजू शकतो की भक्तीमय सेवेने त्याला जो आनंद मिळतो आहे तो या दोहोंपेक्षा नक्कीच जास्त उच्च स्तराचा असेल.
१) सालोक्य:- भगवंताबरोबर एकाच ग्रहावर राहणे.
२) सामिप्य :- त्यांच्या सतत सान्निध्यात राहणे.
३) सारुप्य:- त्यांच्यासारखे रूप प्राप्त करणे.
४) सार्षट्री:- त्यांच्यासामान ऐश्वर्य प्राप्त करणे.
५) सायुज्य:- त्यांच्या ज्योतीत विलीन होणे. शुद्ध भक्त ही मुक्ती कधीच स्वीकारत नाही.