नारदांचा व्यासदेवांना उपदेश

अध्याय ५ नारदांचा व्यासदेवांना उपदेश
विभागीकरण
१-४ व्यासदेव का निराश दिसत आहेत याबद्दल नारद मुनी विचारपूस करतात.
५-७ व्यासदेव आपली असंतुष्टता मान्य करतात
८-९ नारद मुनींचा प्रतिसाद :- व्यासदेवांच्या दोन त्रुटी दाखवितात
१०-११ दोन प्रकारचे साहित्य
१२-१६ फक्त भक्ती अमूल्य आहे आणि इतर पद्धतीत बरेच दोष आहेत.
१७-१९ भक्तीतील प्रगती शाश्वत आहे.
२०-२२ व्यासदेवांना आदेश:- श्रीकृष्ण कीर्ती अधिक स्पष्टपणे सादर करा
२३-३१ नारद मुनी स्वतःच्या पुर्वायुष्याचे वर्णन करतात.
३२-३६ कर्मयोग
३७-४० श्रीकृष्ण-कथा श्रवण या तत्वाचे महत्व उघडकीस आणा असा आदेश.

प्रश्न
१) नारदमुनी जेव्हा व्यासदेव यांची विचारपूस करतात तेव्हा कुठले मुख्य मुद्दे उचलतात? (१-४)
२) व्यासदेव आपली असंतुष्टता कशी मान्य करतात? (५-७)
३) नारद व्यासदेवांच्या कुठल्या दोन त्रुटी सांगतात? (८-९)
४) दोन प्रकारचे साहित्य स्पष्ट करा? (१०-११)
५) भक्ती आणि इतर पद्धतींमधील फरक स्पष्ट करा? (१२-१६)
६) नारद मुनींचे काही विशिष्ट गुण स्पष्ट करा जे भक्ती वेदंतांना आकर्षित करू शकले? (२३-३१)
७) नारद मुनी शेवटी व्यासदेवांना कोणता आदेश देतात? (३७-४०)