नारद व्यास संवाद

अध्याय ६ नारद व्यास संवाद

१-४ व्यासदेवांतर्फे नारद मुनींच्या पूर्वायुष्याबद्दल विचारपूस
५-१९ नारदांना भगवंतांचे दर्शन
२०-२७ भगवंतांचे नारदांना उपदेश
२८-३३ नारदांची परमोच्च सिद्धी गाठणे
३४-३८ नारदांचे सारांश रुपी उपदेश आणि निर्गमन
१,२,३, गुरुंशी भक्तीबद्दल विचारपूस करणे ही आध्यात्मिक प्रगतीसाठी फार मोठी आवश्यकता आहे. त्यांच्यासारखी प्रगती करणे शिष्याला वाटणे साहजिक आहे.
४ एका कल्पानंतरही तुमची स्मरणशक्ती कशी fresh आहे?कारण कालांतराने आपण सर्व विसरतो
५. दीक्षेनंतर बऱ्या प्रमाणात शिष्याच्या वागणुकीत फरक दिसणे आवश्यक आहे.
६-९ नारद मुनींच्या आईला सर्प दंश :- शुद्ध भक्ताला भगवंतांच्या जवळ खेचण्याचा हा एक मार्ग आहे. अशाप्रकारे पूर्णपणे त्याला भगवंतांचा आश्रय घेणे भाग पडते. उदा. प्रभुपाद स्वप्न संन्यास , ब्रह्मचारी घर आहे.
उदा. तत ते अनुकम्पाम सुसमिक्ष मानो भून्जान एव आत्म-कृतं विपाकम ह्रुद वाग वपूर भिर विदधान नमस्ते जीवेत यो मुक्ती पदे स दाय भाक
१० भगवंतांचा आपल्या जीवनात असा हस्तक्षेप फक्त भक्तच स्वीकार करू शकतो .कारण भक्तीने भौतिक समृद्धीचा ज्वर नाहीसा होतो.
११ -१३ परीव्रजकाचार्य ( प्रचारक जीवन):- कुटीचक , बहूदक, परीव्रजकाचार्य , परमहंस हे संन्यास आश्रमाचे चार टप्पे आहेत. सोने ,हिरे इत्यादींच्या खाणी बघितल्या तरी आर्थिक विकासावर भर न देता, परम ध्येयावर लक्ष केंद्रित केले.
१४ साधूच्या शारीरिक गरजा :- निसर्गाच्या देणग्या भागवतात. प्रचारकाने गृहस्थाकडे जाणे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान देणे हा एकमात्र उद्देश असतो, काही मागण्यासाठी नव्हे.
१५ ध्यान करण्यासाठी , गुरु , साधू , शास्त्र आणि आपल्या बुद्धीचा उपयोग करणे आवश्यक.
१६ ध्यानस्थ झाल्यानंतरचे अनुभव :- भक्तीचे नऊ स्थर श्रद्धा ते प्रेम-भक्ती लता बीज.
१७ आध्यात्मिक सुखाच्या आणि आनंदाच्या अनुभूतीची भौतिक जगात तुलना नाही.
१८ दोन परिणाम अनुभवले:- मनाच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि सर्व मानसिक विषमता दूर झाली.
भगवंत निराकार किंवा अरूप नसून , भौतिक रूप नसून सत्चितआनंद रूप आहे. आपल्या अनुभवापलीकडे. कोणीच आपल्याला सर्वकाळ मोहित/समाधान करू शकत नाही. उदा. पुरुषाच्या खिश्यात बायकोचा फोटो
– ते रूप नाहीसे झाल्यावर जसे इच्छित वस्तू गमाविल्यासारखे व्याकूळ झाले.

१९ भागवत दर्शन :=- कुठलीही यांत्रिकी विधी नाही, सूर्य आणि भगवंत स्वेच्छेने प्रकट होतात. म्हणून प्रतीक्षेत सेवा करत राहणे.
२०,२१,२२ पूर्ण शुद्धीकरण आवश्यक
२३ ,२४ भक्तीत प्रगती क्रमाक्रमाने वाढते आणि त्यात कालही व्यत्यय आणू शकत नाही.
२५ सर्व शक्तिमान भगवान दर्शन आणि वाणी समानच आहे. महा विष्णूंनी स्वास सोडून वेद निर्माण केले. भगवंतांच्या नाम श्रवणाने त्यांचे दर्शन घेवू शकतो.
२६ मंत्रमुग्ध प्रचार
२७ शुद्ध भक्त:- श्रीकृष्ण यांच्या विचारांमध्ये मग्न आणि सर्व भौतिक आसक्तीतून मुक्तता. त्यांचे शरीर अग्नीत लोखंड असल्याप्रमाणे असते.
२८-३३ नारद मुनी परमोच्च सिद्धी गाठतात.
३४-३८ नारदांचे सारांश रुपी उपदेश आणि निर्गमन