द्रोण पुत्राला दंड

अध्याय सात द्रोण पुत्राला दंड

१-७ व्यास देवांचे चिंतन:- भगवंत आणि त्यांच्या बहिरंग शक्तीचे दर्शन , जीवाचे शरीर म्हणून स्वतःचे अस्तित्व समजणे आणि त्यामुळे दुःख भोगणे ,या दुःखांचे निराकरण कृष्ण भक्तीने शक्य , म्हणून भागवतं चे संकलन
८-११ व्यासदेव यांच्या द्वारे शुकदेव गोस्वामींना भागवतम ची शिकवण
९ आत्माराम असतांनाही शुकदेव गोस्वामी भागवतं अभ्यास करण्याचे श्रम का घेतात?
१० कारण तेही भगवतांच्या लीलांमध्ये रस घेतात.
१२-३४ अश्वत्थामाला अटक
१३-१७ पांडवांच्या पुत्रांचा मृत्यू आणि शोक
८-२१ अर्जुनाचा अश्वथामामागचा पाठलाग आणि ब्रह्मास्त्र सोडणे
२२-२६ अर्जुनाच्या कृष्णाला प्रार्थना
२७-३४ कृष्णाचा प्रतिसाद आणि अर्जुनाद्वारे अश्वथामा अटक
३५-३८ अश्वथामाला दंड देण्यादरम्यान विविध मतभेद
३५-३९ अश्वथामा वधाला कृष्णाचे समर्थन
४०-४१ अर्जुना परीक्षा उत्तीर्ण होणे
४२-४८ द्रौपदीचा सोम्य स्वभाव
४९-५८ कृष्ण कृपेने वादविवाद समाप्ती आणि अर्जुनाद्वारे अश्वथामाला योग्य दंड

व्यासदेवांचे चिंतन – वेदांशी संबंधित सरस्वती नदी- साम्यप्राश परिसर- त्यात त्यांचा आश्रम – बोरांच्या झाडाचे वन- आचमन ध्यानस्थ होणे- भक्तीद्वारे मन एकाग्र करून भगवंत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या बहिरंग शक्तीचे दर्शन होणे – जीव तीन गुणांच्या पलीकडे असून सुद्धा कसा बहिरंगा शक्तीच्या प्रभावाने स्वतःला भौतिक शरीर म्हणून स्वीकारतो आणि परिणामरुपी निरंतर दुःख भोगतो- या दुःखातून मुक्ती म्हणजे अधोक्षज कृष्ण यांची भक्ती म्हणून भागवतं चे संकलन – फक्त श्रवणाने कृष्ण त्वरित हृदयात स्थापित होवून शोक,मोह आणि भय यातून मुक्ती
व्यासदेव यांच्याद्वारे शुकदेव गोस्वामींना भागवतं ची शिकवण – आत्मारामाने हे कष्ट का घ्यावे? शौनक ऋषीद्वारे प्रश्न –भगवंतांच्या लीला सर्वांना आकर्षित करतात.
महाराज परीक्षित यांच्या जन्मापुर्वीचा प्रसंग- महाभारत युद्धात ५ सेनापती 1 – 10 दिवस भीष्म
11 – 15 दिवस: द्रोण , 16 – 17 दिवस: कर्ण , 18 दिवस: शल्य , १८ (रात्री): अश्वत्थामा
– शेवटचा द्रोणपुत्र (फक्त एका रात्रीसाठी) – त्याच्याद्वारे पांडव पुत्रांची झोपेत निर्घुण हत्त्या – द्रौपदीचा आक्रोश – अर्जुनाद्वारे तिचे सांत्वन आणि अश्वत्थामाचे मस्तक आणण्याचे वचन
अश्वथामाचे पलायन – मृत्युच्या भयाने ब्रह्मास्त्र फेकणे – अर्जुन भयभीत कृष्णाला प्राथना – अभयदान देणारे, आध्यात्मिक, असीम कृपा देणारे, अवतरण परित्राणाय साधूनाम विनाशाय चादुष्कृतम – आणि नंतर आकाशातील विलक्षण तेजाचे कारण विचारणे – कृष्णाने उपाय सुचविणे – अर्जुनाने त्याचे ब्रह्मास्त्र सोडणे आणि नंतर दोन्हीही मंत्राद्वारे परत आणणे –अश्वथामाला अटक
कृष्णाद्वारे अर्जुनाची परीक्षा :- ब्रह्मबंधू जो धर्म तत्त्वाचे उल्लंघन करतो त्याला मृत्यू दंड दिलाच पाहिजे- विवीध नियम- तू द्रौपदीला वचन दिले आहे- म्हणून अश्वथामाचा वध कर – पण अर्जुन त्याला द्रौपदीच्या सुपूर्त करतो.
द्रौपदी आपल्या गुरूंचा पुत्र बघून त्यांला दंडवत प्रणाम करते- त्याला (ब्राह्मणाला) बंधीस्थ बघू न शकल्यामुळे सोडण्यास सांगते. (धर्म्यम ) ४३
द्रोणामुळे अर्जुन धनुरविद्या शिकला –हे गुरु ऋण (न्यायम) ४४
पिता पुत्र रुपी जिवंत असतो म्हणून कृपी सती गेली नाही. (सकरूणम) ४५
आदरणीय व्यक्तीला अपमानित करू नये आणि दुःख देवू नये ( निर्व्यलीकम ) ४६
कृपिला माझ्या सारख रडतांना मला बघवणार नाही ( समम ) ४७
ब्राह्मणाचा शाप राजकुळाला नष्ट करू शकतो ( महत ) ४८
युधिष्ठीर महाराज ,नकुल, सात्यकी, सहदेव, अर्जुन, कृष्ण आणि इतर सर्वजण द्रौपदीशी सहमत होतात.- ५०
फक्त भीम सहमत होत नाही
कृष्ण चतुर्भुज रूप धारण करतात. ५२
ब्रह्मबंधूचा वध करू नये आणि आतातयीचा वध करायलाच हवा तर या क्षणी द्रौपदी आणि भीमसेन दोघांनाही प्रसन्न करणे अर्जुनाला भाग आहे. ५४
अर्जुन अश्वत्थामाच्या मस्तकावरून मणी आणि केस तलवारीने काढून टाकतो ५५ त्याला हद्दपार करण्यात येत – ब्रह्मबंधू यांना फक्त पुढील दंड विधानात आहेत- डोक्यावरचे केस कापणे , संपत्ती हिरावून घेणे , घरातून बाहेर काढणे.
शेवटी पांडव परिवार शोकग्रस्त होवून मृत व्यक्तींचा दाह संस्कार करतात.